कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, मानसिक ताण, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव आणि शारीरिक हालचालींची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.बदलेली जीवनशैलीमुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा निस्तेज वाटणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे किंवा त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्वचेच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. तसेच वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र तरीसुद्धा त्वचेच्या समस्या दूर होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय करून पाहावेत. यामुळे चांगला फरक दिसून येतो. त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचेसाठी बाबा रामदेव यांनी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे केवळ त्वचा नाहीतर संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात. त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
कोरफड आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेले घटक शरीराची ऊर्जा वाढवतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कोरफडचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला आणि पचनक्रिया सुधारून रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोरफड जेलचे सेवन करावे. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
भारतीय जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले घटक पदार्थांचा रंग आणि चव वाढवण्यास मदत करतात. हळदीमध्ये असलेले क्युमिन शरीराला ऊर्जा देतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. तुम्हाला जर वारंवार पचनाच्या समस्या उद्भवत असतील तर रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात हळद मिक्स करून प्यावे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी हळदीचे सेवन करावे.
सर्वच स्वयंपाक घरांमध्ये मेथी दाणे कायमच उपलब्ध असतात. मेथी दाण्यांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. मेथी दाण्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास मेथीचे पाणी प्यायल्यास अपचनाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.
फोडणीच्या वाटीमध्ये तूप गरम करून घ्या . त्यानंतर त्यात लसूण, हिंग व कच्ची हळद, फ्रेश कोरफडीचा गर, मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. आहारात गाईच्या तुपाचे सेवन केल्यास पचनक्रिया कायमच निरोगी राहील आणि शरीर मजबूत राहील.