फोटो सौजन्य - Social Media
सरिता आणि तिचा नवरा दीपक मुंबईच्या परळ भागात राहत असतात. काही वर्ष झाली आपण गावी गेलो नाही या उद्देशाने ते दोघे त्यांच्या दोन्ही लहान चिमुरड्यांच्या हौसे मौजेसाठी गावाकडे निघतात. दुपारीच गावी निघाल्याने ते मध्यरात्रीच्या दीडच्या सुमारास कणकवली तालुक्यात स्थित असणाऱ्या त्यांच्या जानवडे या गावात येऊन पोहचतात. गाव तसे रानाने वेढलेले. मोठं मोठ्या झाडांच्या लांबच लांब रांगा रस्त्याच्या कडेला होत्या. त्यांना ST बस स्टॅन्डवर सोडून पुढेंच्या प्रवासाला निघाली.
त्या काळोख्या जागेवर सरिता, दीपक आणि त्यांची दोन मुले राम आणि श्याम होते. घटना चाळीस वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी रस्त्यावर आजच्या सारखे विजेचे खांबे नव्हते. त्या काळोखात रस्ता चिरत हे चौघे त्यांच्या घराकडे जात होते. पण इतक्यात दूरवर त्यांना एक वृद्ध महिला हातात कुऱ्हाड घेऊन, झाडे तोडताना दिसली. दीपक आणि सरिता मुंबई जाण्याअगोदर गावीच राहायचे आहे. त्यामुळे त्यांना गावातील सगळी म्हातारी कोतारी मंडळी ओळखायची. पण ही वृद्ध महिला त्यांच्या काही परिचयाची नव्हती. तो नवीन चेहरा पाहून ते दोघे आश्चर्य तर झाले. त्यापेक्षा भीतीदायक तर रात्रीचे पावणे दोन होत आलेत आणि ही वृद्ध महिला, या रानात झाडे कापत बसली आहे.
मुळात, ती वृद्ध महिला तर वाटेतच होती. अंधार दाट होते. ती महिला कोणीही आणि काहीही असो, ती घराकडे जाण्याच्या वाटेवर आहे. आपल्याला कसेही तिच्या बाजूने जावे लागेल. हे त्या नवरा बायकोच्या ध्यानात होते. मुलांना एका बाजूला सारून हे तिच्या बाजूने चालू लागले. पण सरिता राहवले नाही. त्या वृद्धच्या बाजूला पोहचताच. सरिताच्या तिला प्रश्न केला, “काय अहो आई? इतक्या रात्रीचे इथे काय करत आहात? जा घरी, सकाळी येऊन कामे करा.” सरिताच्या या प्रश्नाला ती वृद्ध महिला काहीच उत्तर देत नाही. सरिता पुन्हा एकदा प्रश्न करते पण इतक्यात दीपक तिला अडवून शांत राहण्यास सांगतो. ते चौघे दाबके पाय टाकत, थोडेशे घाबरलेल्या अवस्थेत पुढे जात असतात, तितक्यात त्या लाकूडतोड्या म्हातारीचा आवाज त्यांच्या कानावर पडतो.
मगाशी इतक्या प्रश्नांचा आराखडा करूनसुद्धा म्हातारीने एक शब्द काढला नाही आणि ती म्हातारी चक्क धीट आवाजात त्यांना म्हणते की, “तुम्हीही लाकूड गोळा करून ठेवा, सकाळी गरज पडेल.” हे ऐकून त्या नवरा बायकोच्या पायाखालची जमीन सरकून जाते. मुलांना पकडून अगदी घराकडे पळत सुटतात. रात्र चांगली जाते. फ्रेश होऊन चौघे झोपून जातात. पण सकाळी त्यांना खरंच लाकडाची गरज पडते. त्या म्हातारीचा प्रत्येक शब्द खरा ठरतो.
त्यांना लाकडाची गरज लागते, ती चितेसाठी. सकाळ होताच सरिताच्या सासरेबुवांचे निधन होते. त्यांना कसलाही आजार नव्हता तसेच त्यांना कसलाही त्रास नव्हता. अचानक झालेल्या या निधनाने, त्या नवरा बायकोला त्या म्हातारीचे शब्द आठवतात. तो क्षण इतका खराब होता की त्यांनी कोकणात रात्रीचे घराबाहेर जाणेही टाळले आहे.
ही घटना वाचकांनी सांगितलेला अनुभव असून या घटनेवर आमचा कोणताही दावा नाही.