Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : दगडं मारणारा भूत! एक भयानक अनुभव; “शिव्या घातल्या आणि त्याने जीवच…”

रायगडच्या माणगावात रुबी शिरेकरला रात्री दगडफेक आणि धड नसलेल्या आकृतीचा अनुभव आला. पण शिव्या घातल्यानंतर ती आकृती अचानक नाहीशी झाली आणि पुन्हा कधीच दिसली नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 26, 2025 | 09:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रायगडच्या माणगावात मोर्बे गावात सलीम शिरेकर नावाचा गृहस्थ कामानिमित्त बाहेरगावी जात असायचा. त्यावेळी त्याच्या घरी त्याची बायको रुबी शिरेकर, घरी एकटी असायची. सलीम तसा आधी एकटा राहायचा. नुकतेच दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या एका महिन्यानंतर, सलीमला महत्वाच्या कामासाठी सौदीला बोलवण्यात आले होते. घर तसे मोठे होते. त्या घरात फक्त दोघेच राहत होते. अशात सलीमला कामानिमित्त लगेच बोलवल्यामुळे रुबी घरी एकटी राहिली.

Horror Story: गडद अंधारात ‘ती’ बाई! काही बोलेना… “लाकूड गोळा करून ठेवा, गरज लागेल” आणि सकाळी घरात

पहिला आठवडा तिच्यासाठी फार भयंकर गेला. त्यात असा अनुभव तिला मिळाला जो तिच्यासाठी फार नवीन होता. संध्याकाळचे ९ वाजले की दररोज कुणी तरी तिच्या घरावर दगडे मारत असे, आधीचे दोन दिवस तिने फारसे लक्ष दिले नाही. तिला वाटले की गावातले पोरं असतील, छेडछाड करण्यासाठी मुद्दाम घरावर दगडे मारत असतील. पण दररोज सारख्या वेळी सारखी गोष्ट घडते, हे तिच्या लक्षात आले. म्हणून तिने एकेदिवशी, दगड घरी येताच, घराच्या बाहेर खिडकीतून पहिले. तिला एका माणसाची आकृती जाणवली. पण भयानक म्हणजे त्या आकृतीला धड नव्हते. फक्त पाय आणि वर मान!

ती त्या रात्री फार घाबरली. त्यानंतरच्या रात्रीही तोच प्रकार घडला, जो गेला आठवडाभर घडत होता. घरात दगड आला. तो दगड तिने निरखून पाहिला. दगडावर रक्त लागलं होतं, ते ही ताज! या परिस्थिती एक बाब तिच्या लक्षात आली. दररोज घरामध्ये येणाऱ्या दगडाचा आकार, दगडाचा रंग सारखाच आहे, जणू एकच दगड दररोज फेकला जात असावा. त्या रात्री तर ती आकृती तिला अगदी तिच्या नजीकच सापडली. या रात्री रुबी इतकी घाबरली होती की तो प्रसंग घडताच, रुबी शेजारच्या हसीना दिगरकर काकूंच्या घरी पोहचली.

हसीना काकू रुबीची अवस्था पाहून “काय घडले असावे?” हे ओळखून गेली होती, कारण हसीना काकुंसोबतदेखील हीच घटना आधी घडली होती, जेव्हा ते सासुरवास अनुभवण्यासाठी आले होते. हसीना काकूंनी तिला विचारले, “बुटक्या… तुला पण दिसला वाटतं. पण बाय, घाबरू नकोस! आज हवं तर इथेच थांब, उद्या दगड आली की जेवढ्या पाठ आहेत, तेवढ्या शिव्या घाल.” त्या रात्री रुबी हसीना काकूंकडे झोपी गेली.

Horror Story : “अहो, ऐका ना! मला हा पत्ता…” रात्री अडीच वाजता दूध विकतेय, ते ही स्मशानात!

त्यानंतरच्या रात्री साडे ९ च्या सुमारास. पुन्हा दगड आली. रुबी हिम्मत करून खिडकीच्या इथे धावत गेली. दूरवर तिला ती आकृती दिसली. रुबीने कसलाही विचार न करता. त्या आकृतीला जोरजोरात शिव्या घातल्या. अगदी चार ते पाच शिव्या ऐकून, ती आकृती नाहीशी झाली. रुबीच्या जीवात जीव आला. तिला वाटलं उद्या पण हेच घडलं तर आणखीन शिव्या घालू. पण तिला त्या गोष्टीची जराही गरज पडली नाही, कारण त्या दिवसानंतर ती आकृती तिला कधीच दिसली नाही.

ही घटना वाचकांनी सांगितलेला अनुभव असून या घटनेवर आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Horror story morbe goan stone thrower ghost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • ghost
  • horror places
  • kokan

संबंधित बातम्या

Horror Story: गडद अंधारात ‘ती’ बाई! काही बोलेना… “लाकूड गोळा करून ठेवा, गरज लागेल” आणि सकाळी घरात
1

Horror Story: गडद अंधारात ‘ती’ बाई! काही बोलेना… “लाकूड गोळा करून ठेवा, गरज लागेल” आणि सकाळी घरात

Horror Story : “अहो, ऐका ना! मला हा पत्ता…” रात्री अडीच वाजता दूध विकतेय, ते ही स्मशानात!
2

Horror Story : “अहो, ऐका ना! मला हा पत्ता…” रात्री अडीच वाजता दूध विकतेय, ते ही स्मशानात!

Horror Story : ‘काका, मला माझ्या घरी सोडाल का?’ घर नाही स्मशान! Eastern Express हायवेवर दिसणारी ‘ती’ चिमुकली…
3

Horror Story : ‘काका, मला माझ्या घरी सोडाल का?’ घर नाही स्मशान! Eastern Express हायवेवर दिसणारी ‘ती’ चिमुकली…

Horror Story : “मॅक्डेनिला” नावाचे भूत! रात्री येरझाऱ्या घालणारी नर्स… हॉस्पिटल नव्हे तर स्मशान
4

Horror Story : “मॅक्डेनिला” नावाचे भूत! रात्री येरझाऱ्या घालणारी नर्स… हॉस्पिटल नव्हे तर स्मशान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.