फोटो सौजन्य - Social Media
कोकण दिवसा जेवढा सुंदर तितकाच रात्रीच्या वेळी भयंकर! जर तुम्ही कोकणातील असाल तर तुम्हाला असं का? याचे उत्तर ठाऊकच असेल. अमिषा आणि तिची आई कुंदा, दोघं ठाण्यातून त्यांच्या गावी निघाले होते. रात्रीचा प्रवास होता. कुंदा यांचे बंधू श्रीमत अगदी शेवटची घटिका मोजत होते. आईला मामाची शेवटची भेट घडवून द्यावी, या उद्देशाने आईला या बद्दल कसलीही खबर न लाऊन देता अमिषा आईसह गावी निघाली होती. रात्री 12 च्या सुमारास मामेभाव बंधूचा कॉल आला आणि कसलाही विलंब न लावता. त्या दोघी निघाल्या. कुंदाला गावी जाण्याचे कारण ठाऊक नव्हते.
रात्रीचे दिड वाजले होते. त्या दोघींनी पनवेलचा टप्पा गाठला होता. पळस्पेच्या पुढे नुकतीच मुंबई गोवा हायवेला गाडी लागली होती. सगळं काही शांत आणि सुरळीत होतं. पाहता पाहता, कर्नाळा अभयारण्य सुरू झाले. त्या जंगलात अगदी वाऱ्याच्या वेगाने गाडी सुसाट धावत होती. इतक्यात कुंदा अमिषाला म्हणते की,”पोरी, मला भूक लागलीये गं. अचानक!” अमिषा म्हणते की,”ठीके आई. रस्त्याला ढाबा किंवा हॉटेल लागताच मी गाडी थांबवेल. आपण खाऊन घेऊ.”
ती रात्र फार काळोखी होती. नभाआड चंद्रही नव्हता. कर्नाळा अभयारण्याचा परिसर तसा 15 मिनिटांत संपून जातो. पण तेव्हा तो संपता संपत नव्हता. मुळात, रस्ता संपत का नाही? या मुद्द्यावर त्या दोघांमध्ये चर्चाही झाली. इतक्यात त्यांच्याबरोबर एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे त्यांना दूरवर एक वडापावचा ठेला दिसला. त्यांच्या गाडीपासून ते अंतर तसे फार नव्हते. पण जसं जसे ते त्या वडापावच्या दिशेने जात. तसतसा तो ठिकाण त्यांच्यापासून दूर होत जातं. ते तिथपर्यंत पोहचू शकत नव्हते, असं काही त्यांच्याबरोबर घडत होते.
अनेक मिनिटांच्या त्रासानंतर तसेच प्रयत्नानंतर ते त्या वडापाव स्टोअर्सच्या जवळ येऊन पोहचतात. पण अचानक अमिषाला भास होतो की तिच्या गाडीखाली एखादी महिला चिरडली गेली आहे. अमिषा खटकन गाडी थांबवते. अमिषा आणि कुंदा गाडीच्या मागच्या बाजूला बघतात पण त्यांना तो केवळ भास झाला असतो. गाडीच्या मागे ना कुणी जखमी महिला असते आणि ना ही जखमांमुळे रस्त्यावर सांडलेले रक्त! दोघे अगदी घाबरून एकमेकांच्या तोंडाकडे बघतात.
पण या पेक्षा भयंकर गोष्ट अशी की जसे ते पुन्हा त्या वडापाव स्टोअर्सच्या दिशेने पाहतात तर तिथे कुठलाही वडापावचा दुकान हयात नसतो. आपल्यसोबत हे काय घडतंय? असा प्रश्न त्या दोघांच्या मनात असतो. अचानक अमिषाचा कॉल रिंग करू लागतो. बंधूचा कॉल असतो. मामा गेल्याची बातमी देण्यासाठी त्याने कॉल केलेला असतो. अमिषाला कंठ आवरत नाही पण कशीबशी ती स्वतःला आवरते. आईला काही न सांगता ती गावच्या दिशेने निघते.