फोटो सौजन्य - Social Media
कोकणात सकाळ पण इतकी भयाण असते याचा अंदाज या कथेतून बांधता येतो. हा प्रसंग ऐकतानाच घामाच्या धारा निघतात. प्रसंग दापोली तालुक्यातील धुत्रोली या गावात घडली आहे. राम्या, लक्ष्या आणि राण्या तिघे भाऊ सकाळ सकाळी अगदी पहाटेच्या सुमारास रानाच्या दिशेने निघतात. राम्या आदल्या रात्री लक्ष्याला म्हणतो. ” रं… लक्ष्या, परवा मुंबईस जाणार हाव ना! जा… दादासला सांग, उंद्या सकाळी आंब्याला जाऊ. सतीच्या मालावर चिक्कार आंबे आलेत. (बाणकोटी बोली)” लक्ष्या राम्याचे बोल ऐकून, मोठा भाऊ राण्याला सकाळचा बेत सांगतो. तिघेही तयारी करून झोपून जातात.
सकाळच्या प्रहरी अगदी अंधारातच तिघे सतीच्या माळाकडे निघू लागतात. सतीचा माळ त्यांच्या वाडीपासून तसा फार दूर! पण तिथे आंबे फार असतात. तिघे माळावर पोहचतात. वाटेत त्यांना कुणीही भेटत नाही. तिघे त्या काळोखात रानातून रस्ता काढत माळाच्या टोकावर पोहचतात. समोर मोठी खोल दरी असते. दरी दाट वनांनी भरलेली असते. पण अचानक त्यांना तेथून कुणाची तरी हाक येते. मोठा भाऊ राण्याला “राण्या, राण्या, राण्या…” करत कुणी तरी हाक देत असतं. त्या दरीतून इतकं वर आवाज येणे तर अशक्य होते. पण कोकणात असे म्हणतात की “काही चुकीचं घडणार असेल तर राखणदार स्वतः येऊन सावध करतो.” कदाचित राण्याला येणारा तो आवाज राखणदाराचा इशारा असावा.
तिघे जणं विचारात तर जातात पण निर्णय नाही घेत. ते भावंडं दरीमध्ये उतरू लागतात. त्या रानाच्या दिशेने जातात. दाट वनांनी वेढलेल्या त्या रानात गावातील फारसं कुणी फिरकत नाही. तरी जमिनीला सूर्यप्रकाश लागलेला असतो. त्या कोवळ्या वातावरणात, हे तिघे भावंडं झाडावर चढून आंबे काढत असतात. तिघे इतके हुशार की तिघेंच्या तिघे झाडावर चढले असतात. इतक्यात त्यांना झाडाच्या दूरवरून एक धिप्पाड व्यक्ती जोरजोरात पाऊल आपटत. कुऱ्हाडीने शेजारची सगळी झाडे कापत येत असतो. एक नाही सगळ्या झाडांना त्याची धारधार कुऱ्हाड लागत असते. शेवटी, तो व्यक्ती त्यांच्या झाडाच्या खालून रंगात तशाच कुऱ्हाडीने झाडं कापत निघून जातो. तो व्यक्ती माणूस वाटतच नव्हता! तो लांब गेल्यावर, हे तिघे झाडावरून उतरून घराकडे पळत सुटतात.
त्या रात्री तिघेही तापाने फणफणले असतात. त्यांना काय घडलं? याचा विचार करूनही घामाच्या धारा सुटतात.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)