
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार
केंद्रीय अर्थसंकल्पात ३२४४ कोटींची तरतूद
५०० नवीन तलावांची निर्मिती व करमुक्त मासेमारी
कणकवली: केंद्रीय अर्थसंकल्पात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रलंबित कोलहापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासह मच्छीमार आणि बागायतदारांच्या उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्यात आली आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे विजयदुर्ग व देवगड बंदर विकसित होणार आहे. त्यामुळे कोकणातील बाहेर गेलेले रोजगारासाठी तरुण पुन्हा गावाकडे बळतील. केंद्र व राज्य या डबल इंजिनच्या सरकारमुळे केंद्रीय अर्थसंकल्पातून कोकणच्या विकासाला चालना मिळाली असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते.
५०-५०% खर्च उचलणार
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदीमुळे कोकणच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे, विशेषतः कोल्हापूर-वैभववाडी या ६ हजार ५०० कोटीच्या रेल्वे प्रकल्यासाठी केंद आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून ३ हजार २४४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती
५०० नवीन तलावांची निर्मिती व करमुक्त मासेमारी
या मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे नियोजन असून २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. हा मार्ग कोकणला बेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडून व्यापाराचे नवे दालन उपडेल, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा, नारायण राणे यांचे आभार मानतो, असे मंत्री नितेश राणे म्हणाले, मत्स्य व्यवसाय आणि किनारपट्टीच्या विकासावर सरकार गंभीर आहे, त्यासाठी ५०० नवीन तलावांची निर्मिती आणि खोल समुद्रातील मासेमारी करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीवरील मच्छिमारांसाठी गटनिर्मिती करण्यात येणार आहे.
फळ उत्पादनाला नवी दिशा
यामुळे मच्छिमारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, तसेच नारळ संवर्धन योजनेच्या माध्यमातून फळ उत्पादनाला नयी दिशा मिळणार आहे. कोकणमातील बागायतदारांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यटन वाढीसाठी जालवाहतूक आणि ‘सी-प्लेन निर्मितीसाठी तरतूद करण्यात आली आहे.
कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”
नितेश राणेंनी दिली माहिती
बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावा, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.