Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fertility Issue: स्वस्तातील वंध्यत्व उपचारांची निवड केल्यास ते अधिक महाग कसे पडतात? कमी पैशातील उपाय डोक्याला ताप

वंध्यत्वावरील उपाय हे स्वस्तात करायला गेलात तर कदाचित त्याचे उलट परिणाम होऊ शकतात. वंधत्वांवरील उपायांची तुम्ही स्वस्तात निवड केल्यास नक्की काय परिणाम भोगावे लागू शकतात, अधिक माहिती जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 15, 2025 | 05:14 PM
स्वस्तातील वंध्यत्वाचे उपाय ठरू शकतात त्रासदायक (फोटो सौजन्य - iStock)

स्वस्तातील वंध्यत्वाचे उपाय ठरू शकतात त्रासदायक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • वंध्यत्व निवारण करण्यासाठी पर्याय
  • स्वस्त खर्चात उपाय करणं योग्य आहे का 
  • कोणते परिणाम भोगावे लागतात 
वंध्यत्व निवारणासाठी कमी खर्चाच्या पर्यायांचे आवाहन करणे समजण्याजोगे आहे पण ‘बजेट आयव्हीएफ’ अनेकांसाठी अपेक्षेहून जास्त खर्चिक ठरलेली आहे. स्वस्त वंध्यत्व निवारण उपचारांचा पर्याय पहिल्या दृष्टीक्षेपात आर्थिकदृष्ट्या चातुर्याचा वाटू शकतो. मात्र, त्याच्या यशाच्या प्रमाणातील छुप्या तडजोडी, आवश्यक चक्रांची (सायकल्स) संख्या आणि दीर्घकालीन भावनिक व आर्थिक ताण या सर्वांमुळे बहुतेकदा बचतीसाठी निवडलेला पर्याय अत्यंत महागडा ठरतो. 

किंमत आणि मूल्य यांच्यातील फरक

आयव्हीएफ ही संसाधनकेंद्री प्रक्रिया असल्याचे नागपूरच्या बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीफमधील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्रमोद मधुकर येरणे सांगतात. जागतिक पद्धतींविषयीच्या एका सर्वसमावेशक अहवालानुसार, आयव्हीएफच्या सरासरी खर्चात विस्तृत तफावती असल्या तरीही अगदी कमी संसाधने असलेल्या ठिकाणीही या उपचारांचा खर्च बराच असतो. स्टिम्युलेशन नियमांचे अगदीच किमान स्तरावर पालन, स्वस्त औषधांचा वापर किंवा प्रयोगशाळेतील प्रक्रियांचे सुलभीकरण यांद्वारे काही क्लिनिक्समध्ये हा खर्च कमी होतो. मात्र, वरकरणी खर्च कमी झाल्यासारखे वाटले तरी दर्जा नियंत्रणाच्या महत्त्वपूर्ण उपायांसोबत तडजोड झाल्यामुळे हे महागात पडू शकते. नियमांमध्ये काही बदल केल्यामुळे औषधांचा खर्च कमी होत असला आणि अंडाशयांच्या अतिउत्तेजनाची जोखीम कमी होत असली तरी त्यातून कमी अंडी निर्माण होतात (कधी-कधी तर केवळ १-३), त्यामुळे गर्भांची संख्याही कमी होते असे  ‘मिनिमल स्टिम्युलेशन आयव्हीएफ’वर झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. 

गर्भांची निर्मिती कमी झाल्यास प्रत्येक चक्रातील गर्भधारणेची संभाव्यता कमी होते. उदाहरणार्थ, तरुण स्त्रियांमधील पारंपरिक आयव्हीएफ आणि मिनिमल-स्टिम्युलेशन प्रोटोकॉल यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, मिनिमल-स्टिम्युलेशन प्रोटोकॉल गटातील स्त्रियांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण तुलनेने कमी दिसून आले. 

पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा

अधिक चक्रे, अधिक ताण, अधिक खर्च

प्रत्येक चक्रात यश मिळण्याचा दर कमी झाल्यास गर्भधारणेसाठी अधिक चक्रांमधून जाण्याची आवश्यकता सहसा निर्माण होते. सुरुवातीला ‘बजेट आयव्हीएफ’ वाटणारा पर्याय भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही बाजूंनी त्रासदायक होतो. कारण, जोडप्यांना वारंवार या चक्रांतून जावे लागते. अनेक चक्रांमधून जावे लागल्यास औषधांचा व प्रक्रियांचा खर्च तर वाढतोच पण भावनिक ताण तसेच अनिश्चितताही वाढते.

शिवाय, यशाचा दर अधिक असलेल्या क्लिनिक्सचा कल अधिक दर लावण्याकडे असतो हे तर नक्कीच. लाइव्ह-बर्थ-रेट असलेल्या क्लिनिक्सचे दरही चढे असल्याचे यूकेमध्ये झालेल्या एका राष्ट्रव्यापी आढावा अभ्यासात दिसून आले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर: सिद्ध झालेला दर्जा व सातत्यपूर्ण निष्पत्ती यांसाठी बहुतेकदा किंमत मोजावी लागते पण अखेरीस त्यांतून चांगले मूल्य मिळते, विशेषत: आयव्हीएफच्या अनेक चक्रांतून जावे लागण्यापेक्षा ही किंमत मोजणे लाभाचे असते. 

परवडण्याजोगा दराचा भ्रम

कमी खर्चातील आयव्हीएफ उपचार आपल्या आवाक्यातील आहेत असे वाटू शकते पण एका चक्रात काम न झाल्यामुळे अनेक आयव्हीएफ चक्रांतून जावे लागल्यास निकोप गर्भधारणा साध्य करण्याचा एकूण खर्च हा अपेक्षेहून खूपच वाढू शकतो. शिवाय, वय, अंडकोशातील शिल्लक साठा, वीर्य व गर्भाचा दर्जा, गर्भाशयाची निकोपता आणि जीवनशैली यांचाही यशस्वीतेवर लक्षणीय परिणाम होत असतो. स्वस्त उपचारपद्धती या जीवशास्त्रीय वास्तवांमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. 

योग्य पर्यायाची निवड: नेमके काय बघाल?

माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय हा दराच्या पलीकडे जाणारा असावा. संभाव्य रुग्णांनी पुढील मुद्दयांचे मूल्यमापन केले पाहिजे:

  • क्लिनिकची पूर्वीची कामगिरी: काळाच्या ओघात सिद्ध झालेला यशस्वीता दर, हा केवळ प्रमोशनासाठी सांगितलेल्या आकडेवारीहून वेगळा असतो
  • प्रयोगशाळेचा दर्जा व तंत्रज्ञान: गर्भासंदर्भातील प्रक्रिया व्यवस्थित केल्या जाणे, नियमांवर देखरेख आणि कुशल एम्ब्रायोलॉजी कर्मचारी
  • व्यक्तीनुरूप पद्धती: रुग्णाचे वय, अंडाशयातील शिल्लक साठा आणि वंध्यत्वाबाबतचे निदान यांनुसार उपचारांच्या पद्धती निश्चित केल्या जाव्यात– स्वस्त योजनांमध्ये सर्वांसाठी सरसकट पद्धती वापरल्या जाण्याचा धोका असतो
  • संभाव्य निष्पत्तीबाबत पारदर्शकता: प्रत्येक चक्राच्या वेळी अपेक्षित यश, चक्राची पुनरावृत्ती करावी लागण्याची शक्यता तसेच अंदाजे खर्च यांबद्दल प्रामाणिकपणे चर्चा केली जावी.
सारांश

वंध्यत्व निवारण उपचार घेताना सर्वांत स्वस्त भासणारा पर्याय हा दीर्घकाळात आर्थिकदृष्ट्या किफायतशीर क्वचितच ठरतो. ‘बजेट IVF’ सायकल आपल्या आवाक्यातील आहे असे पहिल्या पायरीवर वाटू शकते पण अनेक जोडप्यांना त्यामुळे पुन्हा-पुन्हा त्या चक्रांतून जावे लागते, त्यांच्यावरील भावनिक ताण वाढतो आणि एकूण खर्चही वाढतो. आर्थिक आणि व्यक्तिगत दोन्ही स्तरांवर हे खर्चिक ठरते. वंध्यत्व निवारणातील मूल्य हे सर्वांत कमी दरांमध्ये नव्हे, तर समजूतदार, पुराव्यावर आधारित पद्धतींमध्ये सामावलेले आहे. या पद्धतींमुळे नि:संदिग्धता व प्रामाणिकपणा यांच्या माध्यमातून निकोप गर्भधारणेची संभाव्यता जास्तीत-जास्त वाढते.

10 तासांपेक्षा झोपणे ठरू शकते गंभीर, वंध्यत्व-डायबिटीससह 5 आजारांचा वाढतो धोका

Web Title: How can choosing inexpensive infertility treatments end up being more expensive low cost solutions can be a headache

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Health Tips
  • infertility
  • male infertility

संबंधित बातम्या

‘Covid Vaccine मुळे तरूणांचा अचानक मृत्यू नाही…’, AIIMS – ICMR च्या रिसर्चमध्ये खुलासा, भयानक आजारच ठरत आहेत कारण
1

‘Covid Vaccine मुळे तरूणांचा अचानक मृत्यू नाही…’, AIIMS – ICMR च्या रिसर्चमध्ये खुलासा, भयानक आजारच ठरत आहेत कारण

Diarrhea Home Remedy : अतिसारात फायदेशीर ठरतो पेरूच्या पानांचा काढा; सद्गुरूंनी सांगितली बनवण्याची योग्य पद्धत
2

Diarrhea Home Remedy : अतिसारात फायदेशीर ठरतो पेरूच्या पानांचा काढा; सद्गुरूंनी सांगितली बनवण्याची योग्य पद्धत

हिवाळ्यात हाता-पायांची बोटं सुजू लागलीयेत? अनेक उपाय करूनही आराम मिळत नाहीये… डॉक्टरांनी सांगितलं यामागचं खरं कारण
3

हिवाळ्यात हाता-पायांची बोटं सुजू लागलीयेत? अनेक उपाय करूनही आराम मिळत नाहीये… डॉक्टरांनी सांगितलं यामागचं खरं कारण

60 च्या वयातही 30 चा जबरदस्त Stamina, मिलिंद सोमणसारखे सुडौल दिसण्यासाठी कसे रहाल फिट; Fitness Secret
4

60 च्या वयातही 30 चा जबरदस्त Stamina, मिलिंद सोमणसारखे सुडौल दिसण्यासाठी कसे रहाल फिट; Fitness Secret

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.