असा कॉफीचा वापर केल्याने डोक्यावरील एक एक पांढरा केस होईल मुळापासून काळा, योग्य पद्धत जाणून घ्या
केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. वयाच्या 30 ते 35 नंतर लोकांचे केस हळूहळू पांढरे होऊ लागतात. राखाडी केस लपविण्यासाठी लोक हेअर कलरचा वापर करतात. मात्र बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक हेअर कलर हे रासायनिक पदार्थांपासून बनवले जातात, ज्यामुळे आपल्या केसांचे नुकसान होऊ शकते. तुम्हीही रासायनिक हेअर कलर वापरण्याची चूक करत असाल तर वेळीच थांबा.
जर तुमचे केस पांढरे होऊ लागले तर तुम्ही कलर डाय वापरू नये. डायमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात जी तुमच्या केसांना हानी पोहोचवतात. रंगामुळेही केसगळती वाढू लागते. अशा परिस्थितीत केसांना डाय न लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल की डाय लावली नाही तर काय करायचं? चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या केसांना पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही रंगाऐवजी कॉफीचा वापर करू शकता. कॉफीचा वापर तुमच्या केसांना काळेशार करण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. चला तर मग कॉफीपासून नैसर्गिक हेअर डाय कसा तयार ते जाणून घ्या.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कॉफीपासून अशी बनवा हेअर डाय पावडर
यासाठी सर्व प्रथम, गॅस चालू करा आणि पॅन ठेवा. पॅनमध्ये 1 ग्लास पाणी घाला. पाणी उकळायला लागल्यावर यात 2 चमचे कॉफी घाला. पाणी थोडा वेळ उकळू द्या. त्यानंतर या पाण्यात अर्धा कप मेंदी पावडर टाका आणि चांगले मिसळा. हळूहळू पाणी घट्ट होऊ लागले की त्यात एक चमचा आवळा पावडर टाका आणि मिक्स करा. आवळा घातल्याने, तुमच्या केसांचा रंग खूप गडद होतो, गॅस बंद करण्यापूर्वी, रंगाची कन्सिसटेंसी चेक करा. हे खूप पातळ किंवा जाड नसावे. कॉफी हेअर डाई पावडर तयार झाल्यावर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. चांगल्या परिणामांसाठी, ते रात्रभर झाकून ठेवा किंवा कमीतकमी 3 ते 4 तासांनंतर वापरा.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हेअर डाय पावडरचा वापर कसा करावा
घरी तयार केलेला हा कॉफीचा हेअर डाय वापरण्यासाठी, प्रथम आपले केस धुवा. केस सुकल्यावर हा हेअर डाई ब्रशच्या मदतीने पांढऱ्या केसांवर लावा. हा रंग तुमच्या केसांवर किमान 2 तास राहू द्या. निर्धारित वेळेनंतर, आपले केस धुवा (लक्षात ठेवा की आपले केस शॅम्पूने धुवू नका). रात्री तेल लावा आणि नंतर दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवा. असे केल्याने निश्तिचत तुम्हाला तुमच्या केसांवर प्रभावी परिणाम दिसू लागतील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.