
अ ते ज्ञ मध्ये अनेक अक्षरं आहेत. मात्र या अक्षरांचा घटनेनुसार आणि त्या त्या शब्दांचा अर्थ बदलतो. मराठी भाषेची हीच खरी गंमत आहे, की ती वळवावी तशी वळते. याच गंमतीचा भाग असलेला अक्षर म्हणजे च. लिहाताना सारखाचं असला तरी उच्चारताना च वेगवेगळा आहे. तो कसा ते पाहुयात.
सांगयाचं झालंच तर चमचा. हा शब्द लिहिताना एकच असला तरी उच्चारतानाा यााचे दोन अर्थ होता. एक चमचा म्हणजे खाण्यासाठी वापरतो तो चमचा. आणि दुसरा चमचा म्हणजे एखाद्याच्या मागेपुढे करणारी व्यक्ती. अशा पद्धतीने चमचा या शब्दाचे दोन अर्थ होतात. व्याकरणावरुन याचा अर्थ बदलतो. अधिक स्पष्टपणे सांगायचं झालंच तर, च हा उच्चारताना जेव्हा टाळूला स्पर्श होतो तेव्हा ते शब्द असतात, चहा, चप्पल आणि चिन्ह तेव्हा च हा उच्चारताना जीभ टाळूला लागते. तेच चौरस, चौकशी , चालणं असं जेव्हा आपण म्हणतो उच्चारला जाणारा च हा वेगळा असतो. हा उच्चारला च काायमच सौम्य असतो. सर्वासाधारण च जेव्हा टाळूला स्पर्श होता तेव्हा च तो जोडाक्षरात तरी असतो किंवा च च्याा पुढे य किंवा न असला तर टाळूला जीभ लागते. जसं की, चिन्ह, चयापचन असे शब्द असतात तेव्हा च पूर्ण च उच्चारला जातो.
खरंतर मराठी भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नाही. पण तिच्या व्याकरणाचा अभ्यास नक्कीच करायला पाहिजेत. मैलामैलावर भाषा आणि तिच्यातले काही शब्द उच्चारताना बदल असले तरी कोणत्या शब्दाचा कसा आणि काय अर्थाचा अनर्थ होईल हे सांगता नाही येत त्यामुळे कोणत्या वाक्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या शब्दात कुठल्या अक्षराचा कसा उच्चार करावा यावरुन त्या वाक्याचा अर्थ लक्षात येतो. मग आहे की नाही ही भाषेची हसवणारी, गोंधळात टाकणारी आणि पेचात पाडणारी गंमत. आजच्या युगात कितीही फ्रेंच, जर्मनी आणि जापनीस भाषा शिकण्याचा ट्रेन्ड असूदेत पण आपण आपली मायबोली टिकवणं, वाढवणं आणि जोपासणं देखील खूप महत्वाचं आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मराठीला कमी न लेखता ही अभिमानाने सर्वांसमोर बोलली जाईल.
जय महाराष्ट्र !