शारीरिक संबंध न ठेवता किती काळ जिवंत राहू शकता? काय सांगता तज्ज्ञ? (फोटो सौजन्य-X)
शारीरित संबंधांबद्दल आणि त्यातील समस्यांबद्दल आजही मोकळेपणाने बोलं जातं नाही. अशाप्रकारच्या चर्चांना अनेकदा निषिद्ध मानलं जातं. तर अनेकजण शारीरिक संबंधाबद्दल हे अश्लीलतेच लक्षण मानतात. आपल्या देशात शारीरिक संबंध ठेवणे ठीक आहे पण त्यावर बोलणे ठीक नाही. त्यामुळे अनेकांना लैंगिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध नसलेल्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक स्वरुपात नेहमीच बदल दिसतात.चला तर मग जाणून घेऊया जे लोक शारीरिक संबंध ठेवत नाहीत, त्यांच्यावर काय परिणाम होतो?
काही लोकांचे त्यांच्या जोडीदारांसोबत तणावपूर्ण संबंध होतात. ते एकमेकांशी जुळलेले आहेत असा विचार करणं बंद करतात. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही.कारण काही लोकांना हे मान्य नसतं की, केवळ शारीरिक संबंध ठेवल्यानेच रिलेशनशिप चांगलं होतं.
जर तु्म्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर याचा फरक त्वचेवर दिसून येतो. शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात डोपामाइन हार्मोन्स रिलीज होतात, आणि यानेच त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
जर तुम्ही विवाहित असाल आणि शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. पण काही कारण नसतानाॉ शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. काही संशोधनात असे समोर आले आहे की, जेव्हा शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा शरीरात इम्युनोग्लोब्युलिन रसायने वाढते, म्हणजे आपले शरीर अनेक रोगांशी लढू शकते.
शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन्स रिलीज होतात. ही न्यूरोकेमिकल्स चिंता किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्यास प्रतिबंध करतात. ते ऑक्सिटोसिन तुम्हाला चांगली झोप येते. जर तुम्ही नियमित शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमचं शरीर हे महत्त्वाचे हार्मोन्स कमी वेळा रिलीज करतील. त्यामुळे तणावाचा सामना करावा लागतो.
वैवाहिक जीवनात जोडप्यांना त्यांचे नातं मजबूत करण्यासाठी नियमित शारीरिक संबंध असणे आवश्यक आहे. दोघांमध्ये त्यांच्या संमतीने नियमित शारीरिक संबंध होतात आणि त्यांच्यात जवळीक वाढते. नाते घट्ट होते. भावनिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या पार्टनरजवळ अधिक राहता.