फोटो सौजन्य - Social Media
संत्री एक असे फळ आहे जे प्रत्येक ऋतूत बाजारात उपलब्ध असते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. विविध पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले हे फळ आरोग्याच्या अनेक समस्यांना दूर करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील हे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरीज कमी असतात, फायबर जास्त असते आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे मेटाबॉलिजम वाढवते आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, दररोज एक संत्री खाल्ल्याने तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारात संत्र्याचा समावेश करून तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
संत्र्याचे फायदे:
अशाप्रकारे करा संत्र्याचे सेवन:
रिकाम्या पोटी खा: दिवसाची सुरुवात तुम्ही संत्री खाऊन करू शकता. यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुधारते आणि दिवसभर भूक नियंत्रित करण्यास मदत करते.
संत्र्याचे ज्यूस: उन्हाळ्याच्या या वातावरणात तुम्ही संत्र्याचा रस पिऊ शकता. साखरेशिवाय ताजा संत्र्याचा रस शरीराला डिटॉक्स करते आणि मेटाबॉलिजम वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते
स्नॅक्समध्ये करा सामील: लहान सहान भुकेला शमवण्यासाठी तुमच्या स्नॅक्समध्ये तुम्ही जंक फूडऐवजी संत्र्याचा समावेश करू शकता. भूक भागवण्यासोबतच, ते शरीराला पोषण देखील प्रदान करते
सॅलडमध्ये समाविष्ट करता येईल: तुमच्या सॅलडमध्ये संत्र्याचे तुकडे घाला. ते केवळ चव वाढवत नाही तर शरीरात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील वाढवते. यामुळे पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
सालीचाही करता येईल वापर: अनेकांना हे ठाऊक नाही पण संत्रेच काय तर त्याची सालही आपल्या चांगल्याच कामी येऊ शकते. या सालीची तुम्ही पावडर तयार करू शकता. संत्र्याच्या सालीची ही पावडर ग्रीन टीमध्ये मिसळा. हे चरबी जाळण्यास मदत करते, ज्यामुळे झटपट वजन कमी होते.
वर्कआउटनंतर करा संत्र्याचे सेवन: व्यायामानंतर संत्री खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स मिळतात, ज्यामुळे केवळ मसल्सची रिकव्हरी होत नाही तर वजन कमी होण्यास देखील मदत होते. वजन कमी करण्यासाठी संत्री हा एक सोपा आणि आरोग्यदायी पर्याय आहे. लवकरात लवकर वजन कमी करायचे असेल तर आजच आपल्या आहारात संत्र्यांचा समावेश करा आणि निरोगी, तंदुरुस्त आयुष्य जगा.