फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजराने ग्रस्त आहे. कुणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, कुणाला लठ्ठपणाचा तर कुणाला वृद्धत्वाचा… आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम शरीरावर होत असतो. आपल्या रोजच्या जीवनातील काही चुकीच्या सवयीचं आजारांना खुले आमंत्रण देत असतात. अशात आजच या सवयी सुधारल्या तर आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतो. निरोगी आरोग्य, मानसिक ताजेपणा आणि चेहऱ्यावरील तेज वाढण्यासाठी जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सद्गुरू (जग्गी वासुदेव) यांनी 30% डायट चॅलेंज फॉलो करण्याचा सल्ला केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही तुमच्या आहारातील 30% भागात फळांचा सामवेश केलात तर याचा एक उत्तम परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर दिसून येईल. आता हे 30% डायट चॅलेंज नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
30% डायट चॅलेंज काय आहे?
सद्गुरूंनी सांगितले की, आपण आपल्या आहारात 30% फळांचा समावेश करायला हवा. याचाच अर्थ जर तुम्ही दिवसातून तीन वेळा आहार घेत असाल तर त्यातील एक वेळेस फाजल फळांचा आहार घ्या. यात तुम्ही एका फळाचा समावेश करा किंवा वेगवेगळ्या हा सर्वोतोपरी तुमचा निर्णय आहे. मूळ मुद्दा काय तर ती फळे सेंद्रिय, नैसर्गिक आणि सहज पचणारी असावीत. फळ ही आपल्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात. यात बरीच पोषकतत्वे आणि जीवनसत्वे असतात, शिवाय फळे शरीराला जलद ऊर्जा देण्याचे काम करतात.
शरीरात दिसून येतील अनेक बदल
या डाएटमुळे तुम्हाला शरीराच्या अनेक भागांवर सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येईल. सद्गुरूंनी सांगितले की, नियमितपणे फळांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, आतड्यांचं आरोग्य सुधारते. एवढेच काय तर यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते. एक उदाहरण देताना सद्गुरूंनी सांगितले की, एका महिलेने सलग 1008 दिवस रोज एक फळ किंवा संत्रं खाल्लं तर याच्या परिणामरुपी तिचं वजन कमी झालं, थायरॉईड, बीपी आणि डायबिटीज सर्वच गायब झालं आणि शरीरावर आश्चर्यकारक परिणाम घडल्याचे तिला दिसून आले.
सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे, या ऋतूत आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असते तर फळे आपल्या शरीरातील ही पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात आणि आपल्या शरीराला हायड्रेट देखील ठेवतात. फळे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठीही फार फायदेशीर आहेत. आपण जेव्हा जड अन्न खातो तेव्हा आपला मेंदू थकतो मात्र फळं पचायला फार सहज आणि हलकी असतात. यामुळे दिवसभर शरीरात उर्जा राहते आणि परिणामरुपी कामात लक्ष लागणं, निर्णयक्षमता आणि एकाग्रता यामध्ये सुधारणा घडून येते.