ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणात टिकून राहण्यासाठी या टिप्स
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका मोठ्या कंपनीमध्ये सीए पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणीने जीवन संपवले. तिच्या मृत्यूमुळे सगळीकडे एकच खळब उडाली. ती मूळची केरळ राज्यातील असून कामानिमित्त पुण्यात राहत होती.मृत्यू झालेल्या मुलीच्या आईने कंपनीतील टॉक्सिक वातावरणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. मागील अनेक दिवसांपासून मुंबई, पुण्यासह आयटी कंपीनीमध्ये चालू असलेल्या टॉक्सिक वातावरणाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर दिसून येत आहे. दिवसभराच्या 24 तासांमध्ये ज्या ठिकाणी कामानिमित्त आपण आठ ते दहा तास असतो, तिथे जर चांगले वातावरण नसेल तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळच्या तरुणीचा मृत्यू.
आयटी क्षेत्रात चालू असलेल्या प्रदूषित वातावरणामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून आले आहेत. स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. त्यात प्रत्येक व्यक्तीला यश मिळेलच असे नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या यशासाठी खूप धडपड करत असते. पण चुकीच्या पद्धतीने मिळाले यश फार काळ टिकत नाही. त्यामुळे ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणात टिकून राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘या’ फळाच्या पानात आहे दमदार ताकद, हृदयाच्या आणि ब्लड शुगरच्या समस्येवर करेल मात
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मोठी धडपड केली जाते. कामानिमित्त अनेकदा ऑफिसमध्ये ८ तासांपेक्षा जास्त वेळा थांबून राहावे लागते. दिवसभर सतत काम करत राहिल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे शरीरात ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीराला आणि मनाला खूप फायदे होतात. मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच मन शांत राहते.
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. तसेच ऑफिसमध्ये अधिक वेळ राहिल्यामुळे जेवायला किंवा नाश्ता करण्यासाठी वेळ भेटत नाही. पण कामातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी देणे आवश्यक आहे. तसेच आहारात पौष्टीक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी आहारात फळे, ज्युस, कडधान्य इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. आठ तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे जीवनशैलीमध्ये बिघाड होतो. सतत काम करून थकलेल्या शरीराला विश्रांती देणे गरजेचे आहे. इतर वेळी पूर्ण झोप घेण्यास शक्य नसेल तर सुटीच्या दिवशी आठ तास झोप घेतली पाहिजे.
हे देखील वाचा: Mental Health खराब होण्याआधी दिसतात ‘हे’ 5 संकेत, वेळीच जाणून घ्या
ऑफिसामधील कामातून वेळ काढून स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. यामुळे मन आनंदी राहते. तसेच कामातून वेळ महिन्यातून एकदा किंवा दोनदा बाहेर फिरायला जावे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. तुमच्या आवडीनिवडी छंद जोपासून तुम्ही मनाला फ्रेश करू शकता.