Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आतडे स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. आतड्यांमध्ये वाढलेले घातक विषाणू शरीराचे नुकसान करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2026 | 01:37 PM
आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

आतड्यांमध्ये खराब विषाणू का वाढतात?
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
गट हेल्थ बिघडल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटातून आतड्यांमध्ये जातात. आतड्यांमध्ये गेल्यानंतर चांगले विषाणू अन्नपदार्थ पचन करण्यासाठी मदत करतात. पण काहीवेळा आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करते. हे सूक्षम विषाणू केवळ अन्नपदार्थ पचन करण्यासाठीच नाहीतर हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतात. पण आतड्यांमधील विषाणूचे संतुलन बिघडल्यानंतर रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तवाहिन्यांमध्ये सूज वाढते आणि गंभीर आजार होतात. त्यामुळे पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी केवळ अन्नपदार्थांच नाहीतर पुरेशी झोप, व्यायाम आणि प्रोबायोटिक्सचा समावेश आहारात असणे तितकेच महत्वाचे आहे. आतडे निरोगी राहिल्यास संपूर्ण शरीर कायमच हेल्दी राहील. चला तर जाणून घेऊया आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

आतड्यांतील चांगले व वाईट बॅक्टेरियांचा शरीरावर होणारा परिणाम:

पचनसंस्थेमधील चांगले आणि वाईट विषाणू शरीरातील कोलेस्ट्रॉवर परिणाम करतात. यामुळे कोणत्याही क्षणी शरीरातील रक्तदाबाची पातळी वाढते. चुकीचे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर त्यात असलेले वाईट विषाणू आतड्यांमध्ये जातात. आतड्यांमध्ये गेल्यानंतर ते थेट रक्तप्रवाहात मिसळून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण करतात. शरीराची पचनसंस्था आणि हृदय एकमेकांशी जोडलेले असतात. आतड्यांमधील बॅक्टेरिया अन्नाचे विघटन करून मेटाबोलाइट्स तयार करतात. जे रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचतात. पण पचनसंस्था खराब झाल्यानंतर आतड्यांतील विषारी घटक रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करून टाकतात.

आतड्यांमधील चांगले विषाणू शरीरातील सूज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पण शरीरात वाईट विषाणूची पातळी वाढल्यानंतर ‘साइटोकिन्स’ नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर वाढतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या आतून सूज येते. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या अजिबात उद्भवत नाही आणि आतड्या सुद्धा स्वच्छ राहतात.

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे:

पचनक्रिया बिघडल्यानंतर ती पुन्हा चांगली करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. दैनंदिन आहारात तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थ खाल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतात. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पालेभाज्या, फळे, फायबरयुक्त पदार्थ, पोषक आहार, भरपूर पाणी, कडधान्य इत्यादो पदार्थ आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात.

किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, लघवीवाटे मुतखडा पडून जाईल बाहेर

पाणी पिण्याचे योग्य प्रमाण:

दिवसभरात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. आतड्यांमधील जमा झालेला विषारी मल पाण्याच्या सेवनामुळे मऊ होतो. आतडे डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी आणि इतर डिटॉक्स पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे. जास्त साखर, मैदा आणि ट्रान्स फॅट पचनसंस्थेतील बॅक्टेरियांचे संतुलन बिघडून जातात. त्यामुळे हे पदार्थ अजिबात खाऊ नये. याशिवाय रोजच्या आहारात दही, ताक, आंबवलेले पदार्थ खाल्यास पचनक्रिया निरोगी राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आतड्यांचे आरोग्य म्हणजे काय?

    Ans: आपल्या पचनसंस्थेत (आतड्यात) राहणाऱ्या सूक्ष्मजीवांचे (बॅक्टेरिया) संतुलन, जे अन्न पचवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

  • Que: चांगल्या आतड्याची लक्षणे कोणती?

    Ans: नियमित शौचास होणे, पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता नसणे, चांगली ऊर्जा पातळी आणि अन्नाची ऍलर्जी नसणे.

  • Que: आतड्यांचे आरोग्य कसे सुधारावे?

    Ans: लसूण, कांदा, केळी, ओट्स यांसारखे पदार्थ खा, जे चांगल्या बॅक्टेरियाला खायला देतात.

Web Title: Can gut virus trigger heart attack or stroke try these home remedies to cleanse your intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • gut health
  • Health Care Tips
  • Improves digestion

संबंधित बातम्या

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त
1

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम
2

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल
3

काम- घर आणि ऑफिसच्या धावपळीमुळे हार्मोनल स्ट्रेस वाढला आहे? मग दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयींमध्ये करा बदल

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.