कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे नेमके काय
तुमच्या मोठ्या आतड्याचा एक भाग असलेल्या कोलनमध्ये कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला कोलोरेक्टल कॅन्सर असे म्हणतात. कोलन हा तुमच्या मोठ्या आतड्याचा पहिला आणि सर्वात मोठा भाग आहे. हा कर्करोग बहुतेक वृद्ध लोकांमध्ये दिसून येतो, मात्र आजकाल तो कोणत्याही वयोगटातील लोकांना होत असलेले दिसून येत आहे.
हे तुमच्या कोलनच्या पेशींमध्ये लहान गुठळ्या तयार होण्यापासून सुरू होते, ज्याला सामान्यतः पॉलीप्स म्हणतात. पॉलीप्स नेहमीच कर्करोगाचे नसतात, परंतु कालांतराने ते कर्करोगात बदलू शकतात. सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच डॉक्टर वेळोवेळी तुम्हाला कोलनशी संबंधित तपासणी आणि चाचण्या करून घेण्यास सांगत असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आणि आपण अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
कोणती आहेत लक्षणे
कोणती लक्षणे दिसू लागतात
काय आहेत कारणं
कोलन कॅन्सर का होतो याचे नेमके कारण अद्याप डॉक्टरांना सापडलेले नाही. जेव्हा कोलन पेशी त्यांचा डीएनए बदलू लागतात तेव्हा कर्करोग होतो. सेलचा डीएनए त्याचे काम करतो आणि जेव्हा यात बदल होतो तेव्हा पेशी खूप वेगाने वाढू लागतात आणि नियंत्रण गमावतात. यामुळे, सेल्स वेळेवर संपत नाहीत आणि त्याचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे हा सेल्सचा झालेला अतिरेक ट्यूमरचे रूप घेतो आणि त्यामुळे कर्करोग होतो.
जोखीम कधी असते
कोणती कारणे असू शकतात
डॉक्टरकडे कधी जावे?
डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ
जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे दिसली आणि ही लक्षणे स्वतःच बरी होत नसतील तर तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी किंवा चाचण्या करून घ्याव्यात जेणेकरून कॅन्सर असला तरी तो वेळेत समजून घेता येईल आणि त्यावर उपचार करता येतील सुरू करता येईल.
हेदेखील वाचा – 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी
उपाय
कोलन कॅन्सरच्या उपचारांमध्ये तुमच्या कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होतो. काही कर्करोगाच्या रुग्णांना लॅपरोस्कोपी नावाची शस्त्रक्रिया देखील आवश्यक असते. याशिवाय पॉलीपेक्टॉमी, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या थेरपीचाही वापर करता येतो.