Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

Kolambi Pulao Recipe : मासेप्रेमींसाठी खास आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास आगरी कोळी स्टाईल कोळंबी पुलावची रेसिपी. फार झटपट तुम्ही ही मसालेदार डिश तयार करू शकता ज्याने घरातील सर्वच खुश होतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2026 | 09:28 AM
रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल 'कोळंबी पुलाव', सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल 'कोळंबी पुलाव', सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

Follow Us
Follow Us:
  • कोळंबीपासून आपण भाजी तर नेहमीच खातो.
  • पण यावेळी काही नवीन ट्राय करून पहा.
  • आजची ही कोळंबी पुलाव रेसिपी नक्कीच तुमच्या प्रियजनांचे मन जिंकेल.
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी वसलेल्या कोळी आणि आगरी समाजाची खाद्यसंस्कृती ही तिखट, खमंग आणि नैसर्गिक मसाल्यांनी समृद्ध अशी ओळखली जाते. समुद्रातून थेट ताज्या माशांपासून ते कोळंबी, खेकडे आणि सुरमईपर्यंत… प्रत्येक पदार्थात साधेपणा असला तरी चवीत मात्र जबरदस्त ठसका असतो. आगरी–कोळी स्टाइल कोळंबी पुलाव हा असाच एक खास पदार्थ आहे, जो मसालेदार असला तरी जड न वाटता सुगंधी आणि रुचकर लागतो.

Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा ‘पनीर स्टफ्ड चिला’, चवीसह आरोग्याचीही काळजी

या पुलावात गारम मसाल्यांचा अतिरेक न करता, कांदा, खोबरे, आलं-लसूण, हिरवी मिरची आणि कोळी मसाल्याचा वापर केला जातो. त्यामुळे कोळंबीची नैसर्गिक चव टिकून राहते आणि भातात समुद्री चवीचा खास सुगंध दरवळतो. कोळी आणि आगरी घरांमध्ये हा पुलाव बहुतेक वेळा सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा रविवारच्या खास जेवणात बनवला जातो. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून, अगदी गावाकडच्या चुलीवर शिजवल्यासारखी चव मिळवणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग, कोळी स्टाईल अस्सल चवीचा कोळंबी पुलाव कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

साहित्य

  • सोललेली कोळंबी – 500 ग्रॅम
  • हळद – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • बासमती तांदूळ – 2 कप (धुऊन 20 मिनिटे भिजवलेले)
  • कांदे (पातळ चिरलेले) – 2 मोठे
  • हिरवी मिरची – 3–4 (उभी कापलेली)
  • आलं-लसूण पेस्ट – 1½ टेबलस्पून
  • किसलेले ओले खोबरे – ½ कप
  • टोमॅटो – 1 (ऐच्छिक, बारीक चिरलेला)
  • कोळी / आगरी मसाला – 2 टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पावडर – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • तमालपत्र – 2
  • लवंग – 4–5
  • काळी मिरी – 6–7 दाणे
  • तेल – 3 टेबलस्पून
  • तूप – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – 4 कप
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
Food Recipe: वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा खमंग कुरकुरीत वडे, लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ

 कृती

  • सर्वप्रथम कोळंबीला हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून 10–15 मिनिटे बाजूला ठेवा.
  • कढईत थोडं तेल गरम करून मॅरिनेट केलेली कोळंबी 2–3 मिनिटे परतून घ्या. पूर्ण शिजवू नका. बाजूला काढून ठेवा.
  • कुकरमध्ये तेल आणि तूप गरम करून तमालपत्र, लवंग आणि मिरी घाला. त्यात कांदे घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता. आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून कच्चा वास जाईपर्यंत परतवा.
  • आता किसलेले खोबरे आणि टोमॅटो घालून 2–3 मिनिटे परता.
  • मग त्यात आगरी कोळी मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पावडर आणि गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतवा.
  • भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने मिसळा. त्यात परतलेली कोळंबी घाला.
  • पाणी आणि मीठ घालून एक उकळी येऊ द्या. कुकरला झाकण लावून 2 शिट्टी काढा किंवा भात शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवा.
  • गॅस बंद करून 10 मिनिटे पुलाव तसेच ठेवा. नंतर हलक्या हाताने भात सैल करा.
  • गरमागरम आगरी–कोळी स्टाइल कोळंबी पुलाव सोलकढी, कांदा-लिंबू आणि हिरवी मिरचीसोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make aagri koli style kolambi pulao note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • marathi recipe
  • pulao
  • pulao recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.