Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

Chicken Lollipop Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही फक्त चिकन लाॅलीपाॅपच नाही तर व्हेज लाॅलीपाॅप देखील तयार करु शकता. बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊदार स्टफिंगने भरलेले हे व्हेज लॉलीपॉप चवीला फार कमाल लागतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2026 | 03:00 PM
व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी 'व्हेज लॉलीपॉप', स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी 'व्हेज लॉलीपॉप', स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेज लॉलीपॉप हा प्रकार अनेकांसाठी नवा आहे. पण विश्वास ठेवा याची चव फारच रुचकर लागते.
  • पार्टीसाठी काही नवीन, आकर्षक आणि टेस्टी स्नॅक शोधत असाल तर व्हेज लॉलीपॉप एक उत्तम पर्याय आहे.
  • चिकन लॉलीपॉप तर आपण बऱ्याचदा खाल्ला असेल यंदा घरीच व्हेज लॉलीपॉप बनवून खा.
चिकन लॉलीपॉप आपल्या सर्वांना ठाऊक आहे पण तुम्ही कधी व्हेज लॉलीपॉपविषयी ऐकले आहे का? व्हेज लॉलीपॉप हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा खमंग आणि आकर्षक स्टार्टर आहे. वाढदिवस, किटी पार्टी, संध्याकाळचा नाश्ता किंवा पावसाळ्यात गरमागरम चहासोबत खाण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा

बाहेर मिळणाऱ्या लॉलीपॉपमध्ये अनेकदा जास्त तेल आणि कृत्रिम सॉस वापरले जातात, पण घरच्या घरी ताज्या भाज्यांपासून बनवलेला व्हेज लॉलीपॉप अधिक पौष्टिक आणि चविष्ट लागतो. गाजर, बीट, कोबी, बटाटा आणि मसाल्यांचा सुंदर मिलाफ यामुळे या पदार्थाला छान रंग आणि चव येते. कुरकुरीत बाहेरील आवरण आणि आतून मऊसर टेक्स्चर यामुळे हा पदार्थ लहान मुलांनाही आवडतो. चला तर मग, सोप्या पद्धतीने घरीच खमंग व्हेज लॉलीपॉप कसे बनवायचे यासाठीची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • उकडलेले बटाटे 3 मध्यम आकाराचे
  • बारीक चिरलेले गाजर अर्धा कप
  • बारीक चिरलेला कोबी अर्धा कप
  • किसलेले बीट अर्धा कप
  • बारीक चिरलेली ढोबळी मिरची अर्धा कप
  • आले-लसूण पेस्ट 1 चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा
  • गरम मसाला अर्धा चमचा
  • चाट मसाला अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • कॉर्नफ्लोअर 2 चमचे
  • ब्रेडक्रम्स 1 कप
  • मैदा 2 चमचे
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • तेल तळण्यासाठी
  • लॉलीपॉप स्टिक्स किंवा आईस्क्रीम काड्या
गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे चांगले कुस्करून घ्या. त्यात गाजर, कोबी, बीट आणि ढोबळी मिरची घाला.
  • यानंतर आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा.
  • मिश्रण घट्ट राहावे यासाठी त्यात कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा चांगले मळून घ्या.
  • आता या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे तयार करा आणि प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी लॉलीपॉप स्टिक हलक्या हाताने खोचा.
  • एका वेगळ्या वाटीत मैदा आणि पाणी घालून पातळ घोळ तयार करा. प्रत्येक गोळा आधी या घोळात बुडवून मग ब्रेडक्रम्समध्ये घोळवा.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे लॉलीपॉप सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले लॉलीपॉप टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
  • गरमागरम व्हेज लॉलीपॉप टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
  • हे लॉलीपॉप पार्टीसाठी अगदी परफेक्ट आणि आकर्षक स्नॅक ठरतो.

Web Title: Not a chicken this time try to make veg lollipop at home perfect dish for starters recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल
1

Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी
2

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा साऊथ स्टाईल मेदू वडा, वाचा सोपी रेसिपी

Recipe : तेच तेच कशाला? यंदा काहीतरी वेगळं ट्राय करा; घरी बनवा क्रमी अँड टेस्टी ‘पनीर यखनी’, रेसिपी आहे मजेदार
3

Recipe : तेच तेच कशाला? यंदा काहीतरी वेगळं ट्राय करा; घरी बनवा क्रमी अँड टेस्टी ‘पनीर यखनी’, रेसिपी आहे मजेदार

Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी
4

Fish Recipe: मासेप्रेमींसाठी खमंग मेजवानी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी फ्राय, पाहतच क्षणी तोंडाला पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.