
केसांची गळती होत असेल तर वापरा आवळा
हल्ली प्रत्येकाला केसगळतीची समस्या आहेत. महिला असो वा पुरुष टक्कल पडण्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसून येत आहेत. यासाठी अनेकदा महागड्या ट्रिटमेंट वापरल्या जातात मात्र त्याचाही काही उपयोग होत नाही असं दिसून येत आहे. मात्र आयुर्वेदातील उत्तम उपाय म्हणजे आवळा. हर्बल वनस्पती असणारा आवळा वापरून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता. ज्याचा उपयोग हा परंपरागत करण्यता आला आहे.
आवळ्याचे तेल तुम्ही घरीच बनवून त्याचा केसांवर वापर करू शकता. याचा केसांना फायदा होतो आणि तुमच्या केसांची गळतीही थांबते तसंच टक्कल पडत असेल तर वेळीच आवळ्याच्या तेलाचा उपयोग तुम्ही करून घ्यावा. आम्ही या लेखात याबाबत अधिक माहिती ब्युटिशियन स्मिता कांबळे यांच्या सल्ल्याने देत आहोत, नक्की वाचा (फोटो सौजन्य – iStock)
आवळ्याचे तेलच का?
केसांसाठी आवळ्याचे तेलच का वापरावे
आम्ही तुम्हाला रेसिपीबद्दल सांगण्यापूर्वी, प्रथम आवळा तेल तुमच्या केसांसाठी इतके फायदेशीर का आहे याबद्दल माहिती घेऊ. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी अॅसिड असून केसांच्या मुळांना मजबूत करण्यास, कोंडा कमी करण्यास, अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यास आणि संपूर्ण टाळूच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करते. आवळा तेलाचा तुमच्या केसांच्या काळजीमध्ये समावेश केल्याने केस अधिक चमकदार, जाडसर आणि मुळापासून मजबूत होतात.
काय साहित्य वापरावे?
आवळ्याच्या तेलासाठी साहित्य
आवळा तेल घरी बनवण्यासाठी, आपल्याला आवश्यक असणारे साहित्य –
कसे बनवावे आवळ्याचे तेल?
एका पातेल्यात खोबरेल किंवा तिळाचे तेल घाला. तुम्हाला आवळा तेल किती बनवायचे आहे यावर तेलाचे प्रमाण अवलंबून असते, पण सुरूवातीला 1 कप तेल घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. मंद आचेवर तेल गरम करा. ते उकळू देऊ नका, कारण जास्त आगीमुळे तेल आणि आवळ्याचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होऊ शकतात.
तेल गरम झाल्यावर चिरलेला ताजा आवळा मिक्स करा आणिॉ मंद आचेवर शिजू द्या म्हणजे त्यातील पोषक द्रव्ये जळणार नाहीत. ते शिजवण्यासाठी 30 मिनिटे लागतात हे लक्षात घ्या.
हेदेखील वाचा – वातावरणातील बदलांचा परिणाम केसांवर दिसू लागल्यास ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी
रंगावर लक्ष द्या
आवळ्याचे तेल बनवताना घ्यायची काळजी
तेल उकळत असताना त्यावर लक्ष ठेवा. जेव्हा तुम्हाला दिसेल की तेलाचा रंग बदलू लागला आहे आणि आवळ्याचे तुकडे तपकिरी होऊ लागले आहेत तेव्हा तुम्ही गॅस बंद करा. याचा अर्थ आहे की आवळ्याचे तत्व तेलात व्यवस्थित मिक्स होत आहे. आवळा तळाशी चिकटू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा आणि नंतर गॅस बंद करा.
थंड करून गाळा
जेव्हा तेल सोनेरी तपकिरी होईल आणि आवळ्याचे तुकडे चांगले शिजतील तेव्हा गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. आवळ्याचे तुकडे गाळण्यासाठी गाळणी किंवा चीजक्लोथ वापरा आणि स्वच्छ भांड्यात तेल गाळून घ्या. आवळ्याच्या तुकड्यांमधून शक्य तितके तेल पिळून घ्या. एका स्वच्छ जारमध्ये भरा आणि तुम्हाला जेव्हा केसांना लावता येईल तेव्हा लावा
कसे लावावे आवळ्याचे तेल
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे घरगुती आवळ्याचे तेल केसांना लावा आणि मालिश करा. साधारण आंघोळीच्या आधी १ तास तुम्ही केसांना लावा आणि नंतर माईल्ड शँपूने केस धुवा. तुम्हाला लवकरच केसांची गळती कमी झाल्याचे दिसून येईल.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.