वर्षभर टिकणारा चाट मसाला आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा
रोजच्या वापरात जेवण बनवताना मसाल्यांचा वापर केला जातो. लाल तिखट, गरम मसाला, हळद किंवा पावभाजीसह इतर सर्वच मसाल्यांचा वापर जेवण बनवताना केला जातो. उन्हाळा सुरु झाल्यानंतर सगळीकडे वाळवणाचे, चटणी, मसाले इत्यादी पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा मसाला म्हणजे चाट मसाला. चाट मसाल्याचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. फळे, भाजी किंवा सॅलड वर चाट मसाला टाकून खाल्ला जातो. चाट मसाला टाकून फळे किंवा ताक प्यायल्यास चव अतिशय सुंदर लागते. पाणीपुरी आणि इतर अनेक पदार्थ बनवताना चाट मसाल्याचा वापर केला जातो. मात्र नेहमीच बाजारात विकत मिळणारा चाट मसाला आणून खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी चाट मसाला बनवू शकता. इतर मसाल्यांप्रमाणे चाट मसाला सुद्धा घरी बनवू शकता. म्हणूच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चाट मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणासाठी जेवणात समाविष्ठ करा हा देशी रायता…