Choocolate Biscuit Recipe : बिस्किट तर सर्वांनाच खायला फार आवडतात. यांची खुशखुशीत चव चहाची मजा द्विगुणित करुन टाकते. चला जाणून घेऊन चाॅकलेट बिस्किटांची रेसिपी.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
बिस्किटे सर्वांच्या आवडीचे आहेत.
चाॅकलेट बिस्किटे तुम्ही घरी तयार करु शकता.
याची रेसिपी फार सोपी आहे.
चॉकलेटची चव आणि बिस्किटांचा खुसखुशीतपणा एकत्र आला की घरच्या घरी तयार होणारी चॉकलेट बिस्किटे सगळ्यांनाच आवडतात. बाजारातील बिस्किटांपेक्षा घरच्या घरी बनवलेल्या बिस्किटांमध्ये साहित्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलता येते. चहासोबत खाण्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाल्यावर ही रेसिपी करून पाहता येते. संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही या बिस्किटांची मजा लुटू शकता. लहान मुलांना तर हा पदार्थ फारच आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपीतुम्ही एकदा बनवून आठवडाभर साठवून ठेवू शकता. घरी बिस्किटे तयार करणे फार अवघड नसून घरातील उपलब्ध साहित्याने ते सहज तयार करता येतात.
यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घेऊन सर्व साहित्य एकत्र चाळून घ्या.
दुसऱ्या भांड्यात मऊ केलेले बटर आणि पिठीसाखर घेऊन मिश्रण हलके आणि मऊ होईपर्यंत फेटून घ्या.
बटर-साखरेच्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घाला आणि नीट एकत्र करा.
आता चाळलेले कोरडे साहित्य थोडे थोडे करून बटरच्या मिश्रणात घाला. आवश्यकतेनुसार दूध घालून मऊसर पीठ तयार करा. पीठ जास्त मळू नका.
तयार पीठात चॉकलेट चिप्स घालून हलक्या हाताने मिसळा. त्यानंतर पीठ १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवल्यास बिस्किटांना चांगला आकार देता येतो.
ओव्हन १७० ते १८० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करा. पीठाचे छोटे गोळे करून ते हलके चपटे करा आणि बेकिंग ट्रेवर अंतर ठेवून मांडून घ्या.
बिस्किटे साधारण १२ ते १५ मिनिटे बेक करा. कडा थोड्या सेट झाल्या की ट्रे बाहेर काढा. बिस्किटे सुरुवातीला थोडी मऊ वाटतील, पण पूर्ण थंड झाल्यावर त्यांना कुरकुरीतपणा येईल.
बिस्किटे पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. चहा, कॉफी किंवा दुधासोबत ही चॉकलेट बिस्किटे सर्व्ह करता येतील.
Web Title: How to make chocoalte biscuit at home recipe in marathi