१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडी पोहे
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अनेक घरांमध्ये अजूनही सकाळच्या नाश्त्यात चहा आणि पोहे खाल्ले जातात. कारण घाईगडबडीमध्ये नाश्त्यात काय हे सुचत नाही. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. कोकणात बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. ओल खोबर आणि घरातील पारंपरिक पदार्थांचा वापर करून अनेक नवनवीन पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये काकडी पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काकडी खाल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. याशिवाय पोहे पचनासाठी अतिशय हलके असतात. चला तर जाणून घेऊया काकडी पोहे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Raksha Bandhan 2025 : सणानिमित्त घरी बनवा राजस्थानची फेमस मिठाई ‘घेवर’, फार सोपी आहे रेसिपी
साबुदाणे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवास भाजणीचे थालीपीठ, नोट करून घ्या पदार्थ