(फोटो सौजन्य: Pinterest)
रक्षाबंधनाचा दिवस आता जवळ आला आहे. यंदा ९ ऑगस्ट रोजी देशभर रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला जाणार आहे. भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित या सणानिमित्त नात्यांचा गोडवा आणखीन वाढवला जातो. अशात आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी घरी बनवू शकता. ही एक मिठाई असून राजस्थानचा हा एक पारंपरिक पदार्थ आहे ज्याचे नाव आहे घेवर!
Raksha Bandhan 2025 : सणाचा गोडवा आणखीन वाढेल, खास दिवशी भावासाठी घरीच बनवा मऊसर ‘मिल्क केक’
घेवर ही राजस्थानातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि पारंपरिक गोड डिश आहे, जी प्रामुख्याने श्रावण महिन्यात, तीज आणि रक्षाबंधन सारख्या सणांमध्ये बनवली जाते. ही मिठाई कुरकुरीत, मध्यम गोडसर आणि दिसायला झाकीदार असते. घेवर प्रामुख्याने मैदा, तूप आणि साखर यांपासून तयार केला जातो. यावर शुध्द तूप, साखरेचा पाक, ड्रायफ्रुट्स आणि कधी कधी रबडीही घातली जाते. ही डिश एकदम रिच, स्वादिष्ट आणि उत्सवी वातावरण निर्माण करणारी आहे.

साहित्य
कृती
घेवर किती काळ ताजा राहतो?
साधा घेवर ४-५ दिवस टिकू शकतो, तर मलाई किंवा मावा घेवर १-२ दिवसांत खाऊन संपवावे.






