रामाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दुधी भोपळ्याचा चविष्ट हलवा
संपूर्ण देशभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. रामाची विधिवत पूजा करून वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवद्य रामाला अर्पण केला जातो.देशभरात रामनवमीच्या दिवशी एक वेगळाच जल्लोष आणि उत्साह असतो. सणावाराच्या दिवसांमध्ये नेहमी नेहमी काय गोड पदार्थ बनवावे असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. गुलाबजाम, श्रीखंड किंवा खीर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दुधी भोपळ्याचा हलवा बनवू शकता. याआधी तुम्ही गाजराचा हलवा खाल्लाच असेल. दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये दुधीचा हलवा तयार होतो. जाणून घ्या दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
केळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये केळ्यांपासून बनवा तिखट गोड कोशिंबीर, चव लागेल सुंदर
संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खायचा आहे, मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक मखाणा चाट