
पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
सकाळच्या नाश्त्यात काहींना नियमित ओट्स खाण्याची सवय असते. ओट्स खाल्ल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. याशिवाय ओट्समध्ये असलेले फायबर शरीरासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात उपाशी पोटी बाहेर जाण्यापेक्षा नाश्त्यात ओट्स किंवा इतर पदार्थ बनवून खावेत. पण काहींना ओट्स खायला अजिबात आवडत नाही. कारण ओट्स चवीला अतिशय बेचव लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओट्सपासून मिनी डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.यापूर्वी तुम्ही डाळ तांदुळाचा वापर करून बनवलेला डोसा खाल्ला असेल पण ओट्सपासून बनवलेला डोसासुद्धा चवीला अतिशय सुंदर लागतो. जिम जाणाऱ्या लोकांना कायमच हेल्दी आणि सहज तयार होईल असा नाश्त्यातील पदार्थ खाण्यास हवा असतो. वजन कमी करताना उपाशी पोटी राहण्याऐवजी डाएटमध्ये ओट्सचा समावेश करावा. ओट्स खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया ओट्सपासून मिनी डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)