१० मिनिटांमध्ये बनवा उपवासाचा कुरकुरीत डोसा
नवरात्रीच्या उपवासात अनेक महिला पुरुष नऊ दिवस उपवास करतात. या नऊ दिवसांच्या उपवसामध्ये नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. देवीला रोज वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्या दाखवला जातो. नऊ दिवस मनोभावे देवीची पूजा केल्यास देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये अनेक लोक उपवास करतात. उपवासाच्या दिवशी सतत साबुदाणे आणि बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खाल्यामुळे ऑसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. अपचन झाल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ पचनास जड जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याचा वापर न करता उपवासाचा डोसा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी वेळात तयार होतो. तसेच राजगिऱ्याचे पिठापासून बनवलेला डोसा चवीला सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया उपवासाचा कुरकुरीत डोसा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यात बनवा शिंगाडा पुरी, वाचा सोपी रेसिपी