
वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग दैनंदिन जीवनातील 'या' सवयींमध्ये करा बदल
कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे?
शरीरात कोणत्या कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते?
दैनंदिन जीवनातील कोणत्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे?
आरोग्यासंबंधित अतिशय घातक आजार म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल. रक्तात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल संपूर्ण शरीराचे नुकसान होते. नैसर्गिकरित्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होते. मानवी शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात हेल्दी फॅट्स तयार करते तर खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. जीवनशैलीत होणारा बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे रक्तात उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. उच्च कोलेस्ट्रॉलची चिकट थर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतो. (फोटो सौजन्य – istock)
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला पिवळ्या रंगाचा चिकट थर संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान होतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चिकट थर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. तळलेले पदार्थ, बटर, चीज, क्रीम, जास्त तेलात केलेले पदार्थ आणि पॅकेज्ड स्नॅक्स इत्यादी पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तात कोलेस्ट्रॉल जमा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीवनशैलीतील कोणत्या सवयी फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
व्यायामाचा अभाव, दिवसभर एका जागी बसून राहणे, धूम्रपान, मद्यपान, ताण, हार्मोनल बदल आणि झोप कमी होणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चरबीचा थर हृदयाच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण करतो, ज्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. शरीरात वाढलेल्या उच्च कोलेस्ट्रॉकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, श्वास लागणे, छातीत जडपणा इत्यादी गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे कायमच शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. वारंवार पायांमध्ये मुंग्या येणे, थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत.
रक्तात वाढलेला उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळे, कडधान्ये, ओट्स, जवस, चिया सीड्स, अक्रोड, बदाम इत्यादी भरपूर फायबर असलेल्या आणि फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हेल्दी फॅट्स शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ करण्याचे काम करते. तसेच आहारात बटर, चीज आणि कमी कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डाळीचे सूप किंवा वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेल्या सूपचे सेवन करावे.
शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कच्चा लसूण खावा. लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय मानसिक तणाव कमी करण्यासाठी नधारणा किंवा श्वसनक्रिया उपयुक्त ठरतील. तसेच शरीरास आवश्यक असलेली झोप पूर्ण करणे गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्य बिघडते.
Ans: कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो शरीराच्या पेशी, संप्रेरक आणि जीवनसत्त्वे तयार करण्यासाठी आवश्यक असतो, पण त्याचे जास्त प्रमाण हानिकारक असू शकते.
Ans: संतृप्त आणि ट्रान्स फॅट्सयुक्त आहार, व्यायामाचा अभाव
Ans: जास्त झाल्यास छातीत दुखणे, धाप लागणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.