महाशिवरात्रीसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार फराळी मिसळ
महाशिवरात्रीच्या दिवशी महिला आणि पुरुष उपवास करतात. या दिवशी भगवान शंकराची पूजा करून शंकराला नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. उपवास म्हंटल की सर्वच घरांमध्ये प्रामुख्याने साबुदाणा खिचडी हा पदार्थ बनवला जातो. पण उपाशी पोटी साबुदाण्याच्या खिचडीचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त तयार होते. ज्यामुळे पोट बिघडणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी फराळी मिसळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. फराळी मिसळ चवीला अतिशय सुंदर लागते. तुम्ही बनवलेली फराळी मिसळ घरातील सगळ्यांच नक्की आवडेल. सगळ्यांचं उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळी चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. फराळी मिसळ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया फराळी मिसळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)