फराळाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक शेंगदाण्याची आमटी
महाशिवरात्री हा सण दरवर्षी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेक महिला पुरुष उपवास करतात. याशिवाय शंकराची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. उपवास म्हंटल की अनेक घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात इत्यादी पदार्थ बनवले जातात. वरीचा भात बनवल्यानंतर त्यासोबत शेंगदाण्याची आमटी सुद्धा बनवली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेंगदाण्याची आमटी तुम्ही इतर वेळी जेवणात सुद्धा बनवू शकता. भात, चपाती किंवा भाकरीसोबत शेंगदाण्याची आमटी अतिशय सुंदर लागेल. शेंगदाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे उपवासाच्या दिवशी वरीचा भात नुसताच खाण्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याची आमटी आणि वरीचा भात खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी शेक, वाचा सिंपल रेसिपी