महाशिवरात्रीच्या उपवासात बनवा चविष्ट पौष्टिक वरीची इडली
उपवासाच्या दिवशी नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी खाण्यासाठी नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. उपवास म्हंटल की सगळ्यात आधी साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी बनवली जाते. उपाशी पोटी साबुदाण्याची खिचडी खाल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीचे उपाशी पोटी सेवन करू नये. साबुदाणे खाताना त्यासोबत नेहमीच दह्याचे सेवन करावे. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीचे वरीची इडली बनवू शकता. वरीचा भात पचनास अतिशय हलका असतो. तसेच तुम्ही वरीच्या भातासोबत दही किंवा शेंगदाण्याची आमटी बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया व्रिचिं इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)