थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा अळशीच्या लाडूचे सेवन
थंडीच्या दिवसांमध्ये हाडांचे दुखणे वाढू लागते. वातावरणात बदल झाल्यानंतर शरीरसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र तरीसुद्धा काहीच फरक दिसून येत नाही. अशावेळी आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये दैनंदिन आहारात अळशीच्या बियांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होते. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आढळून येते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या बियांच्या सेवनामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. शिवाय या बियांचे सेवन केल्यामुळे वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण अनेकांना अळशीच्या बिया खायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही या बियांचा वापर करून लाडू बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा