Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

Patolyachi Chutney Recipe : पाटोळ्याची झणझणीत चटणी साध्या जेवणालाही खास बनवते. फार निवडक साहित्यापासून आणि अवघ्या काही मिनिटांतच ही चटणी बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2026 | 03:34 PM
नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा 'पाटोळ्याची चटणी', एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा 'पाटोळ्याची चटणी', एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

Follow Us
Close
Follow Us:
  • पाटोळ्याची भाजी तर आपण अनेकदा खाल्ली असेल.
  • पण तुम्ही कधी पाटोळ्याची चटणी खाल्ली आहे का?
  • ही चटणी जेवणाची चव वाढवते, साध्या वरण-भातासोबत तर याची चव लाजवाब लागते.
दररोजच्या जेवणात कोथिंबीर-पुदिन्याची चटणी असतेच, पण कधी कधी काहीतरी वेगळं, चटकदार आणि घरगुती चव हवीशी वाटते. अशावेळी पाटोळ्याची चटणी हा भन्नाट पर्याय ठरतो. साधारण भाजी म्हणून ओळखला जाणारा पाटोळा जेव्हा मसाल्यांसोबत भाजून चटणीच्या रूपात तयार होतो, तेव्हा त्याची चव पूर्णपणे बदलते. हलकीशी कडवटसर चव, लसूण-आलं आणि शेंगदाण्याची साथ मिळाल्यावर अप्रतिम संतुलन तयार होतं.घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी ही चटणी पोळी-भाकरी, वरणभात किंवा स्नॅक्ससोबतही छान लागते.

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

 पाटोळ्याची चटणी खास का?

पाटोळा अनेकदा दुर्लक्षित भाजी मानली जाते. काहींना त्याची चव साधी वाटते, तर काहींना तो फारसा आवडत नाही. पण हलकं परतून त्याची चटणी बनवली, तर त्याचा स्वाद खुलून येतो. लसूण, आलं, भाजलेले शेंगदाणे आणि थोडं मोहरीचं तेल यामुळे चटणीला अस्सल देशी टच मिळतो. ग्रामीण भागात हंगामी भाज्यांपासून चटण्या बनवण्याची परंपरा आहे; पाटोळ्याची ही चटणी त्याच परंपरेची आठवण करून देते. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 3 ते 4 पाटोळे
  • 1–2 हिरव्या मिरच्या
  • 4–5 लसूण पाकळ्या
  • 1 छोटा तुकडा आलं
  • 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेले हरभरे
  • 1–2 टीस्पून लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ
  • चवीनुसार मीठ
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून भाजलेले जिरेपूड
  • 1 टीस्पून मोहरीचं तेल (ऐच्छिक पण चव वाढवण्यासाठी)
बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

कृती

  • पाटोळे स्वच्छ धुवून साल काढा आणि लहान तुकडे करा.
  • कढईत थोडंसं तेल गरम करून त्यात पाटोळे घालून मध्यम आचेवर मऊ होईपर्यंत परता.
  •  त्यात लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या घालून 2–3 मिनिटे परता.मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.
  • मिक्सरमध्ये हे मिश्रण, शेंगदाणे, मीठ, लाल तिखट, जिरेपूड आणि लिंबाचा रस/चिंच घालून वाटा.
  • आवडीनुसार जाडसर किंवा बारीक वाटू शकता.
  •  शेवटी वरून मोहरीचं तेल घालून हलकं मिसळा.
चव वाढवण्यासाठी टिप्स
  • अधिक तिखट हवं असल्यास मिरच्या वाढवा.
  • चिंचेऐवजी कोकम वापरल्यास वेगळी चव येते.
  • हेल्दी पर्यायासाठी पाटोळे उकडूनही चटणी बनवू शकता.
  • थोडी कोथिंबीर घातल्यास रंग आणि सुगंध वाढतो.

Web Title: Try something new this time make tasty and spicy patolyachi chutney at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.