भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा आंबटगोड कोकम चटणी
दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्रीच्या जेवणात प्रत्येकालच पोटभर आणि चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. डाळ, भात, भाजी आणि भाकरीसोबत जेवणात तोंडी लावण्यासाठी काहींना काही गोड किंवा तिखट पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. जेवणात नेहमीच खीर किंवा अतिगोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. या पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी तुम्ही जेवणात तोंडी लावण्यासाठी आमसुलाची चटणी बनवू शकता. आमसुलांना कोकम सुद्धा म्हंटले जाते. मासे, सोलकढी किंवा पदार्थाचा उग्र वास घालवण्यासाठी कोकमचा वापर केला जातो. कोकम खाल्यामुळे शरीरात वाढलेली ऍसिडिटी किंवा पित्त कमी होते. वारंवार पचनाच्या समस्या उद्भवत असतील तर नियमित कोकम सरबत प्यावे. यामुळे पित्त कमी होईल आणि शरीराला अनेक फायदे होतील.चला तर जाणून घेऊया कोकम चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)