
मराठवाडा स्पेशल रेसिपी! डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट कुरडई भाजी
राज्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये अनेक कायमच पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पारंपरिक पदार्थांची चव अतिशय सुरेख असते. कोकण, विदर्भ, मराठवाडा इत्यादी भागांमध्ये अनेक नवनवीन पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळीकडेच कुरड्यांची भाजी किंवा चुऱ्याची भाजी बनवली जाते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरात वाळवणाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. हे पदार्थ वर्षभर व्यवस्थित टिकून राहतात. मराठवाड्यातील लोकांना तिखट चवीचे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरड्यांची चविष्ट आणि तिखट भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही कुरड्यांची चविष्ट भाजी खाऊ शकता. याशिवाय घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी काय भाजी बनवावी बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी कुरड्यांची भाजी झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया कुरड्यांची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)