थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कुळीथाचा झुणका
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात प्रत्येकालाच काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. या दिवसांमध्ये घरात प्रामुख्याने वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांचा वापर करून सूप बनवले जाते. सूप चवीला अतिशय सुंदर लागते. पण कायमच सूप खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी गावरान पद्धतीमध्ये तुम्ही कुळीथ पिठाचा झुणका बनवू शकता. कुळीथ पिठाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कुळीथ पिठाची पिठी, शेंगोळ्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. कुळीथ पिठाचा गावरान झुणका भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो. गरमागरम भाकरी आणि झुणका असेल तर जेवणात चार घास जास्त जातील. या पिठामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. प्रथिने, लोह, आणि कॅल्शियमने समृद्ध असलेले पीठ हाडे आणि कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळवून देते. चला तर जाणून घेऊया कुळीथ पिठाचा झुणका बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






