Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत डाळभात खाऊन कंटाळा आहे का? मग झटपट बनवा पारंपरिक मसाले भात

सर्वच घरांमध्ये दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात बनवला जातो. भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. पण सतत तोच पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर एक वाटी तांदळाचा वापर करून मसाले भात नक्की बनवून पाहा. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी अजूनही मसाला भात बनवण्याची पद्धत आहे.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाले भात बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा भात नक्की बनवून पाहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2024 | 11:55 AM
पारंपरिक मसाले भात

पारंपरिक मसाले भात

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना सुरु झाल्यानंतर अनेकांच्या घरी मासे, चिकन, अंडी इत्यादी पदार्थ बनवले जात नाहीत. अशावेळी घरात फक्त भाज्या, पालेभाज्या आणि शाहाकारी जेवण बनवले जाते. रोज रोज काय भाजी बनवावी? डाळ कोणती बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. रोज रोज डाळ किंवा तिखट वरण खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत आणि नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. सर्वच घरांमध्ये दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात बनवला जातो. भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. पण सतत तोच पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर एक वाटी तांदळाचा वापर करून मसाले भात नक्की बनवून पाहा. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी अजूनही मसाला भात बनवण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली पद्धत अजूनही जपली जात आहे. चला तर पाहुयात मसाले भात बनवण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • तांदूळ
  • मोहरी
  • जिरं
  • लवंग
  • दालचिनी
  • हिरवी मिरची पेस्ट
  • हिरवे मटार
  • तोंडली
  • काजू
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • हळद
  • हिंग
  • गोडा मसाला
  • ओलं खोबरं
  • कोथिंबीर
  • पाणी
  • मीठ
हे देखील वाचा: १० मिनिटांमध्ये बनवा जाळीदार खमंग ढोकळा, मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

कृती:

  • मसाले भात बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्याशिवाय त्यात कोणतेही पदार्थ टाकू नये.
  • गरम तेलात मोहरी, जिरं, तमालपत्र, लवंग, दालचिनी, आले लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकून झाल्यानंतर फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • फोडणी भाजल्यानंतर त्यात हिरवे मटार, तोंडली, एक वाटी काजू घालून मिक्स करा. मंद आचेवर भाज्यांना एक वाफ येण्यासाठी ठेवा.
  • भाज्यांना वाफ आल्यानंतर त्यात धणे पूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग आणि गोडा मसाला घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • भाज्यांचे मिश्रण अर्धवट शिजल्यानंतर त्यात मीठ, एक वाटी तांदूळ आणि ओल खोबरं टाकून मिक्स करा. तांदळानुसार त्यात पाणी घालून कुकरचे झाकण लावून घ्या.
  • कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवा. तयार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेला मसाला भात.

Web Title: How to make masale bhat at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
1

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन
2

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी
3

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी
4

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.