
Diwali 2026: दिवाळी स्पेशल रेसिपी! कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटीभर तांदळाच्या पिठापासून बनवा चविष्ट बोरं
Diwali 2026: दिवाळी सणाला वसुबारसपासून सुरुवात होते. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक घरात फराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. चकली, शेव, चिवडा, लाडू आणि अनारसे, करंजी यासोबतच पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवले जातात. कोकणातील प्रत्येक घरात दिवाळीला तांदळाच्या पिठाची बोरं आवर्जून बनवली जातात. तांदळाचे पीठ आणि गुळाचा वापर करून बनवलेला चविष्ट आणि शरीरासाठी हेल्दी असलेला पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे बोरं तुम्ही बनवू शकता. सणवारांच्या दिवसांमध्ये पारंपरिक पदार्थ फार कमी घरांमध्ये बनवले जातात. त्यामुळे कमी वेळात तयारी होणारी बोरं तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)