१० मिनिटांमध्ये बनवा मुरमुऱ्यांचे मेदुवडे
दक्षिण भारतामध्ये नाश्त्यामध्ये प्रामुख्याने इडली , डोसा, मेदुवडा इत्यादी पदार्थ प्रामुख्याने बनवले जाते. भारतासह जगभरात सगळीकडे हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मेदुवडा खूप आवडतो. मेदुवडा खाल्ल्यानंतर पोटही भरते आणि चवही छान लागते.आत्तापर्यंत तुम्ही उडीद डाळीपासून बनवलेला मेदुवडा खाल्ला असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला मुरमुऱ्यांचा वापर करून मेदुवडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुरमुऱ्यांपासून लाडू, चिवडा, भेळ, भडंग इत्यादी पदार्थ बनवले जातात. संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी अचानक भूक लागल्यानतंर मुरमुरे खाल्ले जातात. कारण मुरमुरे पचनास हलके असतात. लहान मुलांनासुद्धा तुम्ही मुरमुरे खायला देऊ शकता. चला तर जाणून घेऊया मुरमुऱ्यांचे मेदुवडा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर फेकतील 5 पदार्थ, आजच खायला करा सुरूवात