कडक उन्हाळ्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा संत्र्याचे थंडगार आईस्क्रीम
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. या दिवसांमध्ये थंड पदार्थ, कोल्ड्रिंक, नारळपाणी, आईस्क्रीम इत्यादी थंड पदार्थांचे भरपूर सेवन केले जाते. मात्र नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. बाजारात विकत मिळणारे आईस्क्रीम तयार करताना हानिकारक रंगाचा किंवा दूषित पाण्याचा वापर केला जातो. चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संत्र्याचा वापर करून थंडगार आईस्क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलले आईस्क्रीम चवीला अतिशय सुंदर लागेल याशिवाय घरातील लहान मुलंसुद्धा नक्कीच आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)
जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते पौष्टिक पेय, चवीसह आरोग्यासाठी ठरेल गुणकारी