जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या पानांची चटणी
दैनंदिन आहारात शेवग्याच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीमध्ये असलेले गुणधर्म हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. याशिवाय शेवग्याची पाने, फुले, शेंगा, देठ इत्यादी सर्वच गोष्टी शरीरासाठी आवश्यक आहेत.पौष्टिकतेने समृद्ध असलेली शेवग्याची पाने आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. मात्र आपल्यातील अनेकांना शेवग्याच्या पानांची भाजी खायला आवडत नाही. चवीला कडू असलेली भाजी हाडांसाठी आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या पानाची चटणी भाकरी, चपाती किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता. मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात शेवग्याच्या पानांची चटणी खावी. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा टोमॅटोचा आंबटगोड सार, भातासोबत करा चविष्ट बेत
१० मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीत बनवा आंबा खोबऱ्याची वडी,आठवडाभर टिकून राहील गोड पदार्थ