
१० मिनिटांमध्ये बनवा पंचखाद्य
दरवर्षी कोकणासह मुंबई, पुण्यात गणपती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनासाठी चाकरमानी मुंबईहून कोकणच्या दिशेने निघाले आहेत. बाप्पा आणि कोकणी माणूस हे समीकरण काही वेगळेच आहे. सगळीकडे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. कोकणी माणूस जितक्या आवडीने दिवाळी, दसऱ्याच्या वाट पाहत नाही तितक्या आवडीने गणेश चतुर्थीची वाट पाहत असतो. सप्टेंबर महिना सुरु झाल्यानंतर गणपतीला गावी जाण्याची तयारी सुरु केली जाते. गावखेड्यांमध्ये बाप्पाचे मोठ्या जलौषात स्वागत केले जाते. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दोन वेळा बाप्पाची आरती केली जाते. या आरतीमध्ये प्रसाद म्हणून वेगवेगळे पदार्थ वाटले जातात. पण कोकणात पंचखाद्यचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रसादामधील पंचखाद्य कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे पंचखाद्य अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते.(फोटो सौजन्य-istock)