चवदार आणि लुसलुशीत मोदक आता घरीच बनवा
गणपती बाप्पाच्या आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबई, पुणे, कोकणसह संपूर्ण राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बाप्पा येण्याची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. गणपती बाप्पाच्या नैवेद्यमध्ये नेहमी उकडीचे किंवा इतर पदार्थांचे मोदक दाखवले जातात. गणेशोत्सवात सर्वच घरांमध्ये मोदक बनवले जातात. पण काहींना मोदक बनवायला येत नाही तर काहींच्या मोदकाच्या काळ्याच तुटून जातात. काहीवेळ तांदळाची उकड व्यवस्थित न झाल्यामुळे मोदक कडक आणि चिकट होऊन जातात.
तांदळाची उकड व्यवस्थित झाली नाहीतर मोदकांचा पूर्ण आकार आणि चव बिघडून जाते. तसेच तुम्ही तयार केलेले मोदक उठावदार आणि सुंदर दिसत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हॉटेलसारखे मऊ, फुललेले आणि सुंदर काळ्या पाडून मोदक कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया तांदळाच्या पिठापासून बनवलेले मऊ लुसलुशीत मोदक.(फोटो सौजन्य-istock)

चवदार आणि लुसलुशीत मोदक आता घरीच बनवा






