Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी आणि का सुरू झाली? जाणून घ्या यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

मकरसंक्रांतीचा सण हा मोठा उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदीकुंकू साजरे करतात. हळदीकुंकू हे शुभतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. हळदीकुंकू साजरे का केले जाते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 08, 2026 | 03:44 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मकर संक्रांत कधी आहे
  • मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा
  • धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
 

 

हिंदू संस्कृतीत हळदीकुंकूवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरामध्ये आलेल्या सुहासिनीला हळदीकुंकू दिल्याशिवाय परत पाठवू नये, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. तुझे सौभाग्य अक्षय्य राहो’. ही त्यामागची भावना असते तर शुभकार्यात, सण, उत्सव, समारंभात हळदीकुंकूचा समारंभ अगत्याने केला जात असतो. पण हळदीकुंकूचे विशेष आयोजित घरोघरी मकरसंक्रांत आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत केले जातात. हे हळदीकुंकू समारंभ का करावेत? कुंकवाचे महत्त्व आणि कधीपासून सुरुवात झाली. हळदीकुंकूवात महिला वाण का देतात, याबद्दल जाणून घेऊया.

नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदीकुंकूवाच्या समारंभाचे आयोजन करतात. पण याबद्दल फारसं अनेकांना माहिती नसतं. परंपरागत घरात सासू करते म्हणून सून करते. अशाच पद्धतीने हळदीकुंकू कार्यक्रम सुरू असतात.

मकरसंक्रांतीत हळदीकुंकूवाचा सण का साजरा करतात. पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. हळदीकुंकू करणे म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असे मानले जाते. यावर्षी हळदीकुंकूवाचा सोहळा रथसप्तमी म्हणजे तारखेनुसार 25 जानेवारीपर्यंत करू शकता.

कशी सुरुवात झाली या परंपरेला

कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्येतर महिलांकडून आर्य महिलांनी आपल्याकडे घेतली आहे. जेव्हा आपण अतिप्राचीन मातृसंस्कृती पाहतो त्यात लाल रंगाला विशेष महत्त्व पाहिला मिळतं. इ.स. च्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचं उल्लेख आहे. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व होतं. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात पाहिला मिळते. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य अधिक असून सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय होते.

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे करा ‘हे’ उपाय, सर्व दोष होतील दूर

कुंकू सौभाग्यचं प्रतीक मानलं जातं. भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभकार्यात वापर करण्यात येत आहे. स्त्रियांचं कुंकू हे लेणे मानलं गेलं. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरू झाली. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणते `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो’. अनेक सण, समारंभात हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात. पण संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदीकुंकूवाला अधिक महत्त्व आहे.

कसं करायचं हळदीकुंकू?

हळदीकुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदीकुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करावी. सुहासिनी महिलेला हळदीकुंकू लावून त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लीत करा. त्यानंतर तिची बोराने ओटी भरुन सुहासिनी सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या. वाण देताना पदराचा टोकाने ते दिले पाहिजे. तीळगूळ देऊन नमस्कार करा. नववधूने पाच वर्ष हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करावा.

Makar Sankranti 2026: 23 वर्षांनी मकर संक्रांतीला होणार सूर्य शनिचा महासंयोग, धार्मिकदृष्ट्या काय आहे महत्त्व

हळदीकुंकू समारंभात वाण का देतात?

हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा आधार घेऊन वाण देतात. वाण देणे म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रातीमध्ये हळदीकुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. संक्रातीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यांमधील गोडवादेखील जपतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी सुरू झाली?

    Ans: हळदीकुंकूची परंपरा प्राचीन हिंदू संस्कृतीपासून चालत आलेली आहे. विशेषतः महाराष्ट्रात ही परंपरा मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पाळली जाते. सूर्य उत्तरायणात प्रवेश करताच स्त्री-सौभाग्य आणि समृद्धीसाठी हा विधी केला जातो.

  • Que: मकरसंक्रांतीला हळदीकुंकू का साजरं केलं जातं?

    Ans: हळद व कुंकू हे सौभाग्य, आरोग्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातात. मकरसंक्रांतीला सूर्यदेव शक्तीमान होतात, त्यामुळे महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून सकारात्मक ऊर्जा आणि शुभेच्छा देण्याची परंपरा आहे.

  • Que: हळदीकुंकू करताना वाण का देतात?

    Ans: वाण देणे म्हणजे दान आणि स्नेहाची भावना व्यक्त करणे. यातून महिलांमधील आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि समृद्धीचा संदेश दिला जातो. वाणामध्ये प्रामुख्याने तिळगूळ, भांडी, वस्त्र किंवा उपयुक्त वस्तू दिल्या जातात.

Web Title: Makar sankranti 2026 why haladi kumkum is celebrated on makar sankranti religious and cultural significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • Makar Sankranti

संबंधित बातम्या

रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश
1

रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.