Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुडघ्याच्या संधिवाताचे व्यवस्थापन कसे कराल? किती आहेत टप्पे जाणून घ्या तज्ज्ञांकडून

गुडघे हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे सांधे आहेत आणि ही बाब कोणीही नाकारणार नाही. शरीराचा संपूर्ण भार उचलणाऱ्या गुडघ्यांच्या संधिवाताचे व्यवस्थापन कसे करायचे हे तज्ज्ञांनी सांगितले आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 28, 2025 | 05:00 PM
गुडघेदुखी आणि संधिवाताचा त्रास (फोटो सौजन्य - iStock)

गुडघेदुखी आणि संधिवाताचा त्रास (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आपले गुडघे हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे सांधे असतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण गुडघ्यांचा खूप वापर करत असतो. आपले गुडघे आपल्या शरीराचा संपूर्ण भार सांभाळतात त्यामुळे गुडघे निरोगी राहणे अधिक गरजेचे आहे. गुडघ्याचा संधिवात ही एक सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या आहे.  

ही एखाद्याच्या गतिशीलतेवर आणि शारीरीक हालचालींवर परिणाम करते. गुडघ्याच्या संधिवाताने ग्रासलेल्या व्यक्तींकरिता डॉ. आशिष अरबट, पुण्यातील जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी या लेखाच्या माध्यमातून काही टिप्स दिल्या आहेत.

कधी होतो संधिवात?

गुडघ्याच्या सांध्यातील कूर्चा कालांतराने कमी होतो तेव्हा गुडघ्याचा संधिवात होतो, ज्यामुळे वेदना होणे, सूज येणे आणि स्नायुंचा कडकपणा अशा समस्या उद्भवतात. गुडघ्याच्या संधिवाताचे मुख्य प्रकारांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक संधिवात यांचा समावेश आहे. गुडघ्याचा संधिवात हा वाढत्या वयानुसार, भूतकाळातील  दुखापती किंवा सांध्यावर येणाऱ्या ताणामुळे उद्भवू शकतो. जोखीम घटकांमध्ये लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास आणि वाढते वय कारणीभूत ठरते. सांधेदुखी, हालचाल मंदावणे आणि चालण्यास त्रास होणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत.

मुलांमध्ये संधिवात लवकर सुरू होण्याची कारणे, घ्या जाणून

गुडघ्याच्या संधिवाताचे टप्पे

  • पहिला टप्पा(सुरुवातीचा): या सुरुवातीच्या टप्प्यात, गुडघ्यातील कूर्च्याची झीज होऊ लागतो. लांब अंतर चालल्यानंतर किंवा शारीरिक हालचालींनंतर अस्वस्थता जाणवू शकते
  • दुसरा टप्पा (सौम्य): रुग्णांना जास्त वेळ चालल्यास किंवा उभे राहिल्यावर वेदना जाणवू शकतात आणि स्नायुंमध्ये कडकपणा येऊ शकतो. सांध्यातील कूर्च्याची झीज होते आणि सांध्यामध्ये सूज येऊ लागते, ज्यामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होतो
  • तिसरा टप्पा: या टप्प्यात कूर्चा आता खराब झालेला असतो. सांध्यातील कडकपणामुळे रुग्णांना दैनंदिन कामांमध्ये अस्वस्थता जाणवते. वारंवार वेदना होतात, हालचाल कमी होते आणि सूज वाढू लागते
  • चौथा टप्पा: या टप्प्यात रुग्णांना तीव्र वेदना, सूज आणि हालचालीवर मर्यादा येते. चालणे किंवा उभे राहणे यासारख्या साध्या क्रियादेखील आव्हानात्मक ठरु शकतात. हा प्रगत टप्पा असून यामध्ये कूर्चा पूर्णपणे झिजतो. अशावेळी अधिक विलंब न करता तज्ज्ञाचा सल्ला घेणे योग्य राहील

5 पदार्थ खाऊन करा आर्थरायटीसचा धोका कमी, हाडांसाठी ठरेल वरदान

उपचार कोणते

  • लक्षणे व्यवस्थापित करण्यास आणि वेदना कमी करण्यास तज्ज्ञ तुम्हाला काही औषधांचे सेवन करण्याचा सल्ला देतील. वजन कमी करणे आणि पोहणे किंवा सायकलिंगसारखे कमी तीव्रतेचे व्यायाम गुडघ्याच्या सांध्यावरील ताण कमी करू शकतात
  • ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळा
  • रुग्णांसाठी फिजीओथेरेपी हे एक वरदान ठरू शकते. गुडघ्याभोवतीचे स्नायू बळकट केल्यास शरीराला एक चांगला आधार मिळू शकतो आणि सांध्यांचे कार्य आणि गतिशीलता सुधारू शकतेडॉक्टरांच्या माहितीशिवाय कोणतेही कठोर व्यायाम करू नका
  • तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच व्यायाम करा आणि व्यायामाचा अतिरेक करू नका. गुडघ्याला ब्रेसेससारखे पर्याय देखील उत्तम ठरतात व ते गुडघ्यांवरील दबाव कमी करण्यास मदत करू शकतात
  • गुडघ्याचे ब्रेसेस वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रगत संधिवातासाठी शस्त्रक्रिया आणि गुडघे प्रत्यारोपण प्रक्रियांचा विचार केला जाऊ शकतो. या शस्त्रक्रिया वेदना कमी करू शकतात आणि सांध्याचे कार्य सुधारू शकतात 
  • ही प्रक्रिया जीवनाची एकूण गुणवत्ता देखील सुधारु शकते आणि गतिशीलता पुनर्संचयित करते, ज्यामुळे रुग्णांना चालणे, पायऱ्या चढणे आणि दैनंदिन कामे सहजतेने करता येतात.गुडघ्यासंबंधी कोणत्याही तक्रारी आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे

Web Title: How to manage knee arthritis learn the stages from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • arthritis news
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
1

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा
2

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल
3

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin
4

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.