खाण्यापूर्वी फळं आणि भाजी कोणत्या पद्धतीने स्वच्छ कराव्यात, आयुर्वेदिक टिप्स
फळे आणि भाज्यांमधून शरीराला भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. पण जर ते व्यवस्थित स्वच्छ न करता खाल्ले तर त्यात कीटक देखील असू शकतात. हे जंत खूप धोकादायक असतात आणि पोटात गेल्यानंतर ते घाण पसरवू लागतात. हे अन्न विषबाधा होण्याचे एक प्रमुख कारण आहे. रुग्णाला सतत उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होतो. शरीरात पाण्याची कमतरतादेखील जीवघेणी ठरू शकते.
कीटकांव्यतिरिक्त, फळे आणि भाज्यांमध्ये कीटकनाशकेदेखील असू शकतात. पिकांचा नाश करणाऱ्या कीटकांना मारण्यासाठी हे फवारले जातात. ते मातीतील अन्नाला चिकटून राहतात आणि नंतर शरीरात प्रवेश करतात. अन्नामध्ये जास्त प्रमाणात कीटकनाशके मिसळल्याने कर्करोगाचा धोका वाढतो असे तज्ज्ञांचे मत आहे (फोटो सौजन्य – iStock)
केवळ पाण्याने निघत नाही घाण
लोकांना वाटते की फळे आणि भाज्या पाण्याने धुतल्यानंतर त्यातील घाण निघून जाते. पण कीटक आणि कीटकनाशकांच्या बाबतीत असे नाही, ते तिथेच चिकटून राहतात आणि डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांना स्वच्छ करण्याची योग्य पद्धत आयुर्वेदात स्पष्ट केली आहे, जी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी यांनी शेअर केली आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती शेअर करत लोकांना कशा पद्धतीने फळं आणि भाज्या धुऊन खाव्यात याबाबत जागरूक केले आहे.
कोणत्या पदार्थांवर अधिक घाण
कोणत्या पदार्थांवर अधिक घाण साचते, कसे धुवावेत
द्राक्ष, पीच, स्ट्रॉबेरी, पालक, केल यासारख्या फळं आणि पालेभाज्यांवर अधिक प्रमाणात पेस्टिसाईड्स आणि कीड लागलेली दिसून येते. यामध्ये तुम्ही कोबी वा फ्लॉवरचाही समावेश करू शकता. मात्र कोबी आणि फ्लॉवरमधील कीड पटकन डोळ्यांना दिसून येते. बाकी दिलेल्या पदार्थांमधील लागलेली कीड वा किटकनाशकांचा अंश दिसणे कठीण आहे. त्यामुळे या भाज्या वा फळं खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
काय आहे पद्धत
कोणती पद्धत अवलंबवावी
Chronic Constipation: बद्धकोष्ठतेने झालेत हाल? वेळीच लावा 5 सवयी; पोटात साचलेली घाण पडेल बाहेर
आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिला सल्ला
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.