हळद आणि या 5 रुपयाच्या पदार्थाने बनवा पॅक, त्वचेच्या समस्यांवर ठरेल जालीम उपाय
अनेकदा बदलत्या वातावरणामुळे आपल्या त्वचेच्या समस्यांमध्येही बदल होऊ लागतात. या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी महिला वर्ग नेहमी बाजारातील नवनवीन प्रोडक्टसचा वापर करत असतात. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, बाजारातील अधिकतर प्रोडक्टसमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो जो आपल्या त्वचेसाठी चांगला नाही. अशात तुम्ही या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेचा निखार वाढवण्यासाठी घरगुती फेसपॅकचा वापर करू शकता.
हळद ही सर्व समस्यांवर एक जालीम आणि रामबाण उपाय आहे. आयुर्वेदातही हळदीला फार महत्त्व आहे. त्वचेवरील घाण दूर करून त्वचा उजळवण्यासाठी हळदीची फार मदत होत असते. आज आम्ही तुम्हाला हळदीचा असा एक पॅक सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करू शकता. यात आपण तुरटीचाही वापर करणार आहोत. तुरटी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. तुरटी आपल्या ब्लीचिंग गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या दोन्हींचा एकत्रित वापर चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यास फार फायद्याचे ठरेल.
हेदेखील वाचा – Healthy Alcohol Drink: या अल्कोहल ड्रिंक आहेत हेल्दी, बिनधास्त करा सेवन
हेदेखील वाचा – चमक कमी होऊन चेहरा काळा पडत चाललाय? मग आजच आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये या रसाचा समावेश करा