Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या

Nehru Zoological Park : प्राण्यांच्या हालचालींना त्यांच्या जीवनाला जवळून पाहायचे असेल तर तुम्ही या प्राणीसंग्रहालयाला एकदा नक्की भेट द्यायला हवी. इथे एंट्री घेताच एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 08:16 AM
इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या

इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतातील एका खास ठिकाणी दिवसा अंधार आणि रात्री उजेडाचा अनोखा अनुभव पर्यटकांना मिळतो.
  • येथे विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांचे नैसर्गिक वर्तन जवळून पाहण्याची संधी मिळते.
  • पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या या ठिकाणी काही खास नियमांचाही काटेकोरपणे पालन केले जाते.
सामान्यत: सूर्य उगवला की आपल्याकडे दिवसाची सुरुवात झाली असे मानले जाते. त्याचप्रमाणे सूर्य मावळला की दिवस संपला असे मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? देशात अशी एक जागा आहे जिथे रात्रीही सूर्याचा प्रकाश पाहता येतो आणि दिवसा रात्रीचा अंधार अनुभवता येतो. हे अनोखे ठिकाण हैदरबादमध्ये वसले असून इथे तुम्हाला एका वेगळ्याच जगाचा अनुभव घेता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ठिकाण ‘नॉकटर्नल हाउस’ आहे जिथे अतरंगी वातावरण पाहायला मिळते. या अनोख्या व्यवस्थेमुळे पर्यटकांना अशा प्राण्यांच्या हालचाली पाहता येतात, जे सहसा फक्त रात्रीच सक्रिय असतात आणि दिवसा झोपतात. हेच कारण आहे की, हे ठिकाण पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय आहे. चला ठिकाणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

नेहरू जूलॉजिकल पार्कने नॉकटर्नल (निशाचर) प्राण्यांना दिवसा सक्रिय ठेवण्यासाठी ‘डे-नाइट रिवर्सल’ टेक्निकचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने दिवसा परिसरात कृत्रिम पद्धतीने अंधार केला जातो. रात्रीसारखा अनुभव देण्यासाठी इथे निळ्या आणि लाल लाईटचा वापर केला जातो. याचबरोबर संध्याकाळी जेव्हा प्राणीसंग्रहालय बंद होते तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात लाईट्सचा वापर करुन सकाळ झाल्याचा फिल दिला जातो. यामुळे प्राण्यांना वाटतं की सकाळ झाली आहे आणि ते आराम करु लागतात.

पर्यटकांना प्राण्यांना जाणून घेता येते

नॉकटर्नल हाउसची खासियत म्हणजे याच्या मदतीने पर्यटकांना प्राण्यांना जवळून पाहता येते, त्यांच्या हालचाली, राहणीमान हे सर्व जाणून घेता येते. इथे गेल्यावर असं वाटतं जणू आपण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला आहे. अंधाऱ्या वातावरणात पर्यटकांना घुबड, वटवाघळे, बॅजर, सिव्हेट, स्लो लोरिस आणि जंगली मांजरे यांच्या हालचाली पाहायला मिळतात. इतर प्राणीसंग्रहालयात प्राणी दिवसा झोपेत गुंग असल्याने पर्यटकांना त्यांना नीट पाहता येत नाही ज्यामुळे नॉकटर्नल हाउस त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो. इथे प्राण्यांच्या नैसर्गिक हालचाली जवळून पाहता येतात.

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा…

फ्लॅश फोटोग्राफीला सक्त मनाई

माहितीनुसार, या प्राणीसंग्रहालयात पर्यटकांना फ्लॅश फोटोग्रॅफी करण्यास पूर्णपणे मनाई आहे. अचानक येणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे प्राण्यांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते आणि त्यांच्या आर्टिफिशियल चक्रात बाधा येऊ शकते. पर्यटकांना इथे शांतात ठेवण्यास सांगितले जाते जेणेकरुन प्राण्यांना कोणत्याही प्रकारची भिती किंवा तणाव वाटू नये. तुम्ही प्राणीप्रेमी असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणाला भेट देणे एक सर्वात उत्तम पर्याय असू शकतो.

 

Web Title: Hyderabad unique place where day feels like night and animals stay active all day long travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Hyderabad
  • places to visit
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
1

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
2

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

DSPच्या कथित बेनामी व्यवहारांचा पर्दाफाश; ACBच्या छाप्यात सापडलं रोख रकमेचं मोठं गुपित
3

DSPच्या कथित बेनामी व्यवहारांचा पर्दाफाश; ACBच्या छाप्यात सापडलं रोख रकमेचं मोठं गुपित

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
4

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.