
फोटो सौजन्य - Social Media
जास्त मीठ सेवन करणाऱ्यांसाठीही धोक्याची घंटा वाजते. मीठाचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब वाढतो आणि त्याचा थेट परिणाम मूत्रपिंडांवर होऊन किडनी डॅमेजची शक्यता निर्माण होते. त्वचेच्या समस्या भोगणाऱ्यांसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थही कारणीभूत ठरू शकतात. काही व्यक्तींमध्ये मिल्क प्रोटिन्स आणि हॉर्मोन्समुळे पिंपल्स वाढणे, स्किन इन्फ्लेमेशन आणि ऍक्नेची समस्या निर्माण होते. आधुनिक जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे प्रोसेस्ड व पॅकेज्ड फूड आतड्यांच्या आरोग्यासाठी मोठे घातक आहे. प्रिझर्वेटिव्ह आणि रसायने यामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने गट हेल्थ बिघडते, पचनशक्ती कमी होते आणि गट फ्लोरावर नकारात्मक परिणाम होतो. सोडा आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेली जास्त साखर आणि कृत्रिम घटक पॅनक्रियासवर ताण आणतात, ज्यामुळे इन्सुलिन उत्पादनाचा नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो. एवढेच नव्हे तर, अल्कोहोल आणि तळकट पदार्थांची जोड घेतल्यास फुफ्फुसांवरही परिणाम होतो. इम्युनिटी कमी होणे, इन्फ्लेमेशन वाढणे आणि फुफ्फुसांची क्षमता कमी होणे यासारखे परिणाम दिसू शकतात.
तज्ज्ञांच्या मतानुसार निरोगी राहण्यासाठी अन्नाचे प्रमाण, गुणवत्ता आणि जीवनशैलीतील समतोल अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्यम प्रमाणात अन्न सेवन, ताजे व नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश, व्यायाम, पुरेसे पाणी आणि प्रोसेस्ड तसेच जास्त साखर, मीठ व तळकट पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे हे स्वास्थ्य राखण्याचे सर्वात सोपे सूत्र मानले जाते. चुकीचा आहार हे अनेक आजारांचे मूळ असल्याने ‘काय खावे’ यापेक्षा ‘किती खावे’ हे ओळखणे आजच्या काळात जास्त आवश्यक झाले आहे.