हृदयाचे आरोग्य कसे राखाल
इतरांना मदत करणं किंवा आपला थोडासा वेळ दानधर्मासाठी देणं, यातून आपल्याला काहीशी उबदार भावना अनुभवायला मिळते, पण यातून आपल्याला काही शारीरिक लाभही होत असतात. दयाळूपणाने वागल्याने सुदृढ व दीर्घ आयुष्य लाभण्याची शक्यता असते असे सांगण्यात येते. दयाळूपणा तणाव कमी करतो आणि हृदयाचे आरोग्य सुनिश्चित राखता येते व रक्तदाब कमी होतो. डॉ. बिपीनचंद्र भामरे, मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
दयाळूपणा कसे करते काम
दयेची भावना ही एखाद्याला सहानुभूतीतून देते, ज्या लोकांना जेव्हा असुरक्षित व एकटेपणा वाटतो त्यांना आधाराची अतिशय गरज असते. दयाळूपणा किंवा सहानुभूती अगदी लहानशा क्रियेतून दर्शविली जाऊ शकते जसे की दरवाजा उघडा ठेवणे किंवा जवळून जाणाऱ्या व्यक्तीला पाहून स्मितहास्य करणे, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला किंवा मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे. आजच्या वेगवान जगात, जिथे डिजिटल संवादास अधिक प्राधान्य दिले जाते तिथे समोरा समोर उभे राहून, भेटून केलेला संवाद, नातेसंबंध जपण्यासाठी आवश्यक आहे.
यामुळे इतरांना आनंद मिळेल आणि तुम्हालाही बरे वाटेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दयाळूपणा तुमच्या हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतो. दयाळूपणा तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.
हेदेखील वाचा – जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने एचडीएफसी लाइफद्वारे ‘द मिसिंग बीट’ उपक्रमाचा शुभारंभ
रक्तदाब कमी होणे
तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुम्ही इतरांशी दयाळूपणे वागता तेव्हा तुमचे शरीर ऑक्सिटोसिन सोडण्यास प्रवृत्त होते जे प्रेम व्यक्त करण्यासाठी आवश्यक संप्रेरक आहे. ऑक्सिटोसिनमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमच्या हृदयाचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते. याचबरोबर दयेच्या भावनेमुळे हृदय मजबूत होईल.
हृदय निरोगी कसे राहते?
हृदय निरोगी ठेवण्यासाठी दयाळूपणा करेल मदत
इतरांप्रती असलेली दयेची भावना तुम्हाला आनंदी ठेवते तसेच तुमचे हृदय निरोगी ठेवते. इतरांशी दयाळूपणे वागणे हे तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा उदासीनता दूर करुन समाधानी राहण्यास मदत करते. दयाळूपणा हा देखील स्वत: ची काळजी घेण्याचा एक प्रकार आहे. तणावामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो हे सर्वज्ञात सत्य आहे. तणावाची पातळी वाढल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणून, इतरांबद्दल दयाळू वृत्ती आणि सहानुभूती बाळगणे चांगले राहील.
हेदेखील वाचा – World Heart Day 2024: का साजरा होतो जागतिक हृदय दिन, महत्त्व आणि जागरूकता जाणून घ्या
हृदयावर परिणाम करणारी चिंता आणि नैराश्याचे प्रमाण कमी करते
दयाळूपणा हा एखाद्याला सकारात्मक सामाजिक संवाद साधण्यात आणि इतरांशी जोडून राहण्यास मदत करू शकते. एखाद्या समुदायाचा भाग असणे किंवा इतरांना पाठिंबा देणे हे चिंता आणि नैराश्याविरूद्ध लवचिकता निर्माण करते जे तुमच्या हृदयावर परिणाम करते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तुम्हाला तुमचे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुनिश्चित करायचे असल्यास, इतरांबद्दल सहानुभूती बाळगा. याचा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल! तुमच्या हृदयाचे आरोग्य नक्कीच चांगले राहील.