Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोसा सारखा तव्याला चिकटतोय? मग या टिप्स  फॉलो करा आणि तयार करा पातळ-कुरकुरीत डोसा 

Dosa Making Tips : मार्केटसारखा परफेक्ट, क्रिस्पी डोसा घरी बनवणे काही सोपी गोष्ट नाही. बऱ्याचदा घरी डोसा बनवताना तो तव्याला चिपकतो अशावेळी काय करावं आणि परफेक्ट डोसा कसा तयार करावा ते जाणून घ्या. 

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 19, 2025 | 09:31 AM
डोसा सारखा तव्याला चिकटतोय? मग या टिप्स फॉलो करा आणि तयार करा पातळ-कुरकुरीत डोसा

डोसा सारखा तव्याला चिकटतोय? मग या टिप्स फॉलो करा आणि तयार करा पातळ-कुरकुरीत डोसा

Follow Us
Close
Follow Us:
  • नाश्त्यासाठी डोसा हा पदार्थ अगदी सर्वोत्तम ठरतो.
  • हा फार झटपट तयार होतो आणि चवीलाही फार छान लागतो.
  • बऱ्याचदा डोसा बनवताना तो तव्याला चिकटतो अशावेळी काही गोष्टींचे काळीजी घेणे महत्त्वाचे ठरते.
डोसा ही जरी मूळची दक्षिण भारतीय डिश असली, तरी आज ती संपूर्ण भारतात तितक्याच आवडीने खाल्ली जाते. अनेक घरांमध्ये इडली-डोसा सहज बनतो, पण तरीही काही वेळा डोसा तव्याला चिकटतो, जाडसर होतो किंवा हवा तसा क्रिस्पी राहत नाही. त्यामुळेच काही लोक घरी डोसा करण्यापासून कचरताना दिसतात. जर तुम्हालाही हॉटेलसारखा पातळ, खुसखुशीत आणि परफेक्ट डोसा घरी बनवायचा असेल, तर काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बॅटर तयार करण्यापासून ते तवा गरम करण्यापर्यंत प्रत्येक स्टेप महत्त्वाची असते. या पद्धती फॉलो केल्यास डोसा कधीही तव्याला चिकटणार नाही. चला तर मग, डोसा बनवण्याची योग्य रेसिपी आणि खास टिप्स जाणून घेऊया.

उरलेल्या चपात्या फेकू नका, शिळ्या चपात्यांपासून अवघ्या 5 मिनिटांतच बनवा ‘कुरकुरीत चिवडा’

डोसा बनवण्याची रेसिपी आणि टिप्स

डोसा बॅटर कसा असावा?

डोशाचा बॅटर फार घट्टही नसावा आणि फार पातळही नसावा. योग्य बॅटर असा असतो की चमच्याने घेतल्यावर तो सहज खाली पडतो. जर तुम्ही बाजारातून आणलेला रेडीमेड बॅटर वापरत असाल, तर त्यात थोडेसे पाणी घालून तो योग्य कन्सिस्टन्सीचा करा. कारण अनेकदा रेडीमेड बॅटर जरा जास्तच घट्ट असतो.

योग्य तवा निवडा आणि तयार करा

डोसा करण्यासाठी लोखंडी किंवा कास्ट आयर्नचा सपाट तवा सर्वात चांगला मानला जातो. सर्वप्रथम तवा नीट तापवून घ्या. नंतर त्यावर थोडेसे तेल लावून पूर्ण पृष्ठभाग ग्रीस करा. त्यानंतर ओल्या कापडाने किंवा टिश्यूने जास्तीचे तेल पुसून टाका आणि तवा थोडा थंड होऊ द्या. ही पद्धत केल्यावर तवा जवळजवळ नॉन-स्टिकसारखा काम करतो.

डोसा पसरवण्याची योग्य पद्धत

डोसा टाकण्याआधी तवा मध्यम गरम असावा, खूपच तापलेला नसावा. तव्यावर १–२ थेंब तेल टाकून ते कागद किंवा कापडाने हलकेच पसरवा. आता तव्याच्या मधोमध बॅटर घाला आणि गोलाकार फिरवत हलक्या हाताने पातळ पसरवा. जर तवा खूप गरम वाटत असेल, तर त्यावर थोडेसे पाणी शिंपडा, पाणी आटू द्या आणि मग डोसा टाका.

डोसा खुसखुशीत कसा होईल?

गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि डोसा हलका सोनेरी रंग येईपर्यंत शिजू द्या. डोसा खालीपासून नीट भाजला गेला की त्याच्या कडा आपोआप सुटू लागतात. मसाला डोसा करत असाल तर वरून बटाट्याची भाजी पसरवा आणि डोसा दुमडून घ्या. प्लेन डोसा असल्यास, पलटण्यापूर्वी वरून थोडेसे तूप घातल्यास तो अधिक क्रिस्पी होतो.

हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

डोसा सहज पलटण्यासाठी टिप

डोसा पलटताना वापरणारा स्पॅटुला (पाती) थोडासा ओला करून घ्या. त्यामुळे डोसा तुटत नाही आणि अगदी सहज पलटता येतो. गरमागरम तयार झालेला डोसा नारळाची चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा. या सोप्या पण प्रभावी टिप्स वापरल्यास तुमचा डोसा प्रत्येक वेळी पातळ, खुसखुशीत आणि अगदी हॉटेलसारखा तयार होईल.

Web Title: If your dosa is sticking to the pan then follow these easy cooking trick to make a perfect crispy dosa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • marathi recipe
  • south Indian dish

संबंधित बातम्या

हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी
1

हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

उरलेल्या चपात्या फेकू नका, शिळ्या चपात्यांपासून अवघ्या 5 मिनिटांतच बनवा ‘कुरकुरीत चिवडा’
2

उरलेल्या चपात्या फेकू नका, शिळ्या चपात्यांपासून अवघ्या 5 मिनिटांतच बनवा ‘कुरकुरीत चिवडा’

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत काळ्या चण्याची आमटी, गरमागरम भातासोबत लागेल सुंदर चव
3

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत काळ्या चण्याची आमटी, गरमागरम भातासोबत लागेल सुंदर चव

Winter Recipe : हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवलात की नाही? जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Winter Recipe : हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवलात की नाही? जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.