Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

भजी खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच कांदा किंवा बटाटा भजी बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोळंबी भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 02:02 PM
झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी

झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदाभजी, बटाटा भजी किंवा वेगवेगळ्या भाज्यांपासून भजी बनवली जाते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कुरकुरीत भजी. पण कायमच कांदाभजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही युनिक पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कोळंबी भजी बनवू शकता. सर्वच मासेप्रेमींना कोळंबी खायला खूप जास्त आवडते. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कोळंबी मासा चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. पण कोळंबी स्वच्छ करताना त्याच्या आतील काळ्या रंगाचा धागा काढून टाकावा, अन्यथा कोळंबीच्या सेवनामुळे पोटाला हानी पोहचू शकते. कोणत्याही माशांपासून पदार्थ बनवताना काहीवेळ माशांना मीठ आणि कोकम आगळ लावून ठेवावे. यामुळे माशांना येणारा कुबट वास कमी होतो आणि माशांची चव वाढते. चला तर जाणून घेऊया कोळंबी भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

साहित्य:

  • कोळंबी
  • कढीपत्ता
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • गरम मसाला
  • जिरं धणे पावडर
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • अंड
  • तांदळाचे पीठ
  • बेसन
गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कोळंबी भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लाल किंवा पांढरी कोळंबी स्वच्छ साफ करून घ्या. कोळंबी स्वच्छ करताना त्यातील काळा धागा काढून घ्या.
  • त्यानंतर कोळंबी पाण्याने तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. कोळंबीमधील स्वच्छ पाणी काढून टाका.
  • ताटात कोळंबी घेऊन त्यात बारीक करून घेतलेला कढीपत्ता, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि धणे जिरं पावडर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार आलं लसूण पेस्ट, एक चमचा कोकम आगळ, अंड, तांदळाचे पीठ आणि बेसन घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा. कोळंबीची भजी बनवताना त्यात अजिबात पाणी घालू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यात कोळंबी टाकून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कुरकुरीत कोळंबी भजी.

Web Title: How to make crispy prawn bhaji at home simple food recipe crispy prawn bhaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.